Good News! भारतीय रेल्वेकडून 13 लाख कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, सुरू होणार नवी सुविधा

यामध्ये कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी रेल्वेने डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:21 PM, 26 Nov 2020

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) त्यांच्या 13 लाख कर्मचार्‍यांना एक खास भेट देण्यात आली आहे. यामध्ये कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी रेल्वेने डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे. या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स मॉड्यूलद्वारे त्यांचा शिल्लक पीएफ पाहता येणार आहे. इतकंच नाही तर अ‍ॅडव्हान्स पीएफसाठी ते ऑनलाईन अर्जदेखील करू शकतील. रेल्वे मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की, सुधारित उत्पादकता आणि कर्मचार्‍यांना फायदा मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वेने एचआरएमएस हा एक खास प्रकल्प सुरू केला आहे. (good news for railway employees launche new online facility for like pf advance and balance check)

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या खास सुविधेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस (HRMS) आणि यूझर डेपोची मॉड्यूल्स बाजारात आणण्यात आली आहेत. ज्यामध्ये कर्मचारी सेल्फ सर्व्हिस (ESS) चा लाभ घेऊ शकतात.

या सुविधेमध्ये आणखी एक भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अ‍ॅडव्हान्स मॉड्यूल आहे. ज्यामध्ये कर्मचारी त्यांचा शिल्लक पीएफ तपासू शकतात आणि पीएफ अ‍ॅडव्हान्ससाठी ऑनलाइन अर्जही करू शकतात. ही सगळी प्रोसेस ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना धावपळ करण्याची आवश्यकता भासणार नाही.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मचार्‍यांना त्यांचा पीएफ अर्जाची तारीखही ऑनलाइन पाहता येईल. इतकंच नाही तर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सेटलमेंट मॉड्यूलसुद्धा सुरू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या संपूर्ण सेटलमेंट प्रक्रियेचं डिजिटायझेशन करण्यात येईल.

इतर बातम्या –

Small Savings Schemes: ‘या’ पाच सरकारी योजनांमध्ये जबरदस्त फायदा; मिळणार दुप्पट नफा

लक्ष्मीविलास बँकेच्या DBIL मध्ये विलीनीकरणाला मंत्रिमंडळाकडून मान्यता, NIIF ला 6 हजार कोटींचं मिळणार भांडवल

(good news for railway employees launche new online facility for like pf advance and balance check)