आता सरकारी कंपन्यांना करणार सोन्याहून पिवळे,  ‘या’ युक्तीने चमकणार सरकारी कंपन्याचे शेअर्स

सरकारची हमी असताना, मार्केट कॅप चांगले असताना, डिव्हिडंड मिळत असातानाही काही सरकारी कंपन्यांच्या स्टॉककडे गुंतवणुकदार पाठ फिरवतात. गुंतवणुकदारांच्या या वर्तनाचा अभ्यास केल्यानंतर सरकारने आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन फंडा शोधला आहे. 

आता सरकारी कंपन्यांना करणार सोन्याहून पिवळे,  'या' युक्तीने चमकणार सरकारी कंपन्याचे शेअर्स
मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 8:36 AM

नवी दिल्ली: लोक चकाकीला भूलतात आणि पितळही सोनं म्हणून खरेदी करतात. योग्य मार्केटिंग केले तर वस्तूची ब्रँड व्हल्यू(Brand Value) वाढते. सरकार शेअर मार्केटमध्ये (Share Market) असाच काही धमका करण्याच्या विचारात आहे. सरकारची हमी असताना, मार्केट कॅप चांगले असताना, डिव्हिडंड मिळत असातानाही काही सरकारी कंपन्यांच्या स्टॉककडे गुंतवणुकदार (Investors) पाठ फिरवतात. गुंतवणुकदारांच्या या वर्तनाचा अभ्यास केल्यानंतर सरकारने आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन फंडा शोधला आहे. अर्थात ही कसरत केवळ सरकारी कंपन्यांच्या शेअरची किंमत वाढविणे एवढेच नाही तर गुंतवणूक वाढविणे आणि गुंतवणुकदाराला या वाढीचा, तेजीचा फायदा मिळवून देणे हा पण आहे. शेअर मार्केटमध्ये असणा-या सरकारी कंपन्यांच्या देशभर अनेक मालमत्ता, इमारती आणि इतर संपत्तीचा डोलारा आहे. त्यांची एकत्रित किंमत मोजाता हा आकडा डोळे दिपवणारा आहे. सरकार नेमकी हीच अॅसेट व्हॅल्यू जोडून सरकारी कंपन्यांना सोन्याहून पिवळे करण्याच्या तयारीत आहे.सरकारी कंपन्यांकडून कमाईचा नवा मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे शेअर्समध्ये पैसे गुंतवणा-या ग्राहकांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

काय आहे आयडियाची कल्पना

आपल्या मनात अनेक वेळा प्रश्न येतो की, शेअर मार्केटमध्ये कोणत्याही क्षेत्रातील कुठल्याही खासगी कंपनीच्या तुलनेत सरकारी कंपन्यांचे समभाग पडलेले का दिसतात? पण, काळजी करू नका कारण हा प्रश्न तुम्हालाच पडला असे नाही तर सरकारचा ही या समस्येशी झगडा सुरु आहे. मरगळ आलेल्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये  प्राण फुंकण्यासाठी सरकारने नवी शक्कल लढवली आहे. या कंपन्यांच्या खात्यांमध्ये

सरकार रिअल्टी अॅसेटच्या रिअल व्हॅल्यूचा समावेश करण्याचा विचार करत आहे.  परंतु, यामुळे या कंपन्यांचे समभाग (PSU Stocks) शेअर बाजारात चमकदार कामगिरी करतील  का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा सराव सरकारने केला आहे आणि त्याआधारे ही आयडियाची कल्पना प्रत्यक्षात येणार आहे. खासगी कंपन्यांचे शेअर तेजीत असताना सरकारी कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणुकदार पाठ का फिरवितात या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. अर्थात ही कसरत केवळ सरकारी कंपन्यांच्या शेअरची किंमत वाढविणे एवढेच नाही तर गुंतवणूक वाढविणे आणि गुंतवणुकदाराला या वाढीचा, तेजीचा फायदा मिळवून देणे हा पण आहे.

ताळेबंदच ठरेल हितकारक

सरकारी कंपन्यांनी  त्यांच्या जमीन मालमत्ता, इमारती आणि तत्सम इतर संपत्तीचे खरे मूल्य बाहेर काढावे, अशी सरकारची इच्छा आहे, ही अॅसेट व्हॅल्यू कंपनीने जोडल्यास कंपनीचा परफॉर्मस चार्ट मजबूत दिसेल. सरकारी कंपन्यांचे समभाग तगडे दिसतील. या कंपन्यांचा मजबूत ताळेबंद गुंतवणुकदारांच्या समोर येईल. हा ताळेबंदच सरकारी कंपन्यांना हितकारक ठरेल. मालमत्तांचे आकडेच गुंतवणुकदारांना आकर्षित करतील .मोठमोठ्या आकड्यांचा हा खेळ  किरकोळ गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदार या दोघांनाही फायद्याचे ठरेल. म्हणजे या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये भरपूर पैसाही गुंतवला जाईल, मग खासगी कंपन्यांप्रमाणे हे समभागही वधारतील आणि सरकारला प्रचंड लाभांश मिळेल.

सरकारी कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 14 लाख कोटी रुपये

सरकार खरंच या योजनेबाबत गंभीर आहे. सरकारी कंपन्यांना या मालमत्तांचे मूल्य जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. ही कसरत सरकारला फायद्याची ठरेल. हा ताळेबंद नुकत्याच झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सर्वेक्षणात समाविष्ट केला जाईल. या मालमत्ता पीएसयूमध्ये खूप कमी मूल्यांकनावर नोंदवल्या जातात. आता असे होणार नाही. सध्या सरकारी कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 14 लाख कोटी रुपये आहे.आता कंपन्यांच्या खात्यांमध्ये त्यांची चालू व प्रत्यक्ष किंमत नोंदली गेली तर सरकारी कंपन्यांच्या खात्यांमध्ये एकत्रित भांडवल मोठे दिसेल.ही कसरत  गुंतवणूकदारांनाही पैसे गुंतवण्यासाठी भाग पाडेल आणि या कंपन्यांचं मार्केट कॅपही झपाट्यानं वाढेल, असा कंपन्यांचा होरा आहे.

 इतर बातम्या :

Air India : प्रजासत्ताक दिनानंतर एअर इंडिया टाटाकडे सोपवली जाणार, 18 हजार कोटी रुपयांत मालकी

Cryptocurrency Prices: शेअर बाजार कोमात, तरिही बिटकॉईन जोमात! कोणकोणत्या कॉईनचा बाजार तेजीत? वाचा

Good News for Stock market investors Government firms asked to declare market value of land other real estate assets

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.