Air India : प्रजासत्ताक दिनानंतर एअर इंडिया टाटाकडे सोपवली जाणार, 18 हजार कोटी रुपयांत मालकी

चालू आठवड्यात सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठी 24 तास काम सुरु आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 26 जानेवारी रोजीही काम सुरु राहील. जेणेकरुन गुरुवारी कंपनीचं हस्तांतर करणा येईल.

Air India : प्रजासत्ताक दिनानंतर एअर इंडिया टाटाकडे सोपवली जाणार, 18 हजार कोटी रुपयांत मालकी
एअर इंडिया, रतन टाटा (संपादित छायाचित्र)
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 7:53 PM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन (Republic Day) अर्थात 26 जानेवारीनंतर कोणत्याही दिवशी एअर इंडियाचं (Air India) हस्तांतरण केलं जाण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाला या आठवड्याच्या अखेरिस टाटा समूहाकडे (Tata Group) सुपूर्द केलं जाऊ शकतं. मागील वर्षी 8 ऑक्टोबर रोजी सरकारने टाटा समुहातील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला (Talace Private Limited) एअर इंडिया 18 हजार कोटी रुपयांना विकली आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला टाटा समुहाला एक पत्र जारी करण्यात आलं होतं. त्या पत्रात सरकारकडून एअर लाईन्समधील 100 टक्के भागिदारी विकण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पुढे 25 ऑक्टोबर रोजी केंद्रानं शेअर खरेदी करार केला. पुढील काही दिवसांत सगळी औपचारिकता पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि चालू आठवड्याच्या अखेरिस एअर इंडिया टाटा समुहाकडे सोपवली जाईल, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचं वृत्त टीव्ही 9 भारतवर्षने दिलं आहे. चालू आठवड्यात सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठी 24 तास काम सुरु आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 26 जानेवारी रोजीही काम सुरु राहील. जेणेकरुन गुरुवारी कंपनीचं हस्तांतर करणा येईल.

18 हजार कोटीची बोली

जवळपास 68 वर्षांनंतर तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाच्या मालकीची झाली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली जिंकली. विशेष म्हणजे रतन टाटांनीही ट्विट करत यावर भाष्य केलं होतं. टाटा समूहाच्या ताब्यात पुन्हा एकदा एअर इंडिया आली, ही एक चांगली बातमी आहे. आता एअर इंडियाला पुन्हा उभे करण्यासाठी प्रचंड मेहनत खर्ची करावी लागणार आहे. तसेच विमान उद्योगात टाटा समूहाला एअर इंडियाच्या माध्यमातून एक चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचंही टाटांनी ट्विट करत सांगितलं होतं.

रतन टाटांकडून जेआरडी टाटांच्या आठवणींनाही उजाळा

तसेच रतन टाटांनी यावेळी जेआरडी टाटांच्या आठवणींनाही उजाळा दिलाय. जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. जेआरडी टाटा आज आमच्यामध्ये असते, तर त्यांना खूप आनंद झाला असत, असंही टाटांनी ट्विटमध्ये म्हटलंय. खासगी क्षेत्रासाठी निवडक उद्योग उघडण्याच्या सरकारच्या अलीकडील धोरणाबद्दल आपण ओळखले पाहिजे आणि आभार मानले पाहिजेत, असे सांगत एअर इंडियाचे रतन टाटा यांनी स्वागत केले.

1932 मध्ये एअर इंडियाची स्थापना

एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती, ज्याचे नंतर टाटा एअरलाईन्स असे तिचे नामकरण करण्यात आले. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल 1932 मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटाने कराचीहून मुंबईला हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Nevill Vintcent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने 2,60,000 किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला.

इतर बातम्या :

Cryptocurrency Prices: शेअर बाजार कोमात, तरिही बिटकॉईन जोमात! कोणकोणत्या कॉईनचा बाजार तेजीत? वाचा

12 दिवसांत केलं मालामाल, कोणत्या शेअरनं केली कमाल? दामदुप्पट कामगिरी करणाऱ्या शेअरची खबरबात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.