AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांगली बातमी! आता फक्त 5 मिनिटांत अंगठा लावून ATM मधून काढा रेशन, जाणून घ्या प्रक्रिया

हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील पहिले 'ग्रेन एटीएम' उभारण्यात आलेय.

चांगली बातमी! आता फक्त 5 मिनिटांत अंगठा लावून ATM मधून काढा रेशन, जाणून घ्या प्रक्रिया
Ration Cardholders
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 6:52 PM
Share

नवी दिल्ली: जर तुम्हालाही पूर्वी कमी रेशन (Ration) मिळत होते किंवा तासानतास ताटकळत थांबावे लागत होते, तर आता त्याची अजिबात चिंता करण्याची गरज नाही. नवीन उपक्रमांतर्गत ग्रेन एटीएम (Grain ATM) बसविण्यात आलेत. म्हणजे तुम्ही एटीएमच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटात धान्य काढू शकता. देशातील हे पहिले एटीएम आहे, येथून पैशांऐवजी धान्य निघेल. हे एटीएम फक्त हरियाणाच्या गुरुग्राममध्ये स्थापित केले गेलेय. या एटीएमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याकडे कमी रेशन मिळण्याची तक्रार पूर्णतः संपुष्टात येणार आहे. हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील पहिले ‘ग्रेन एटीएम’ उभारण्यात आलेय. (Good news! Now remove the ration from the ATM in just 5 minutes with your thumb, learn the procedure)

आपण किती धान्य काढू शकता?

या एटीएम मशीनद्वारे तुम्ही पाच ते सात मिनिटांत एकाच वेळी 70 किलो धान्य काढू शकता. गुरुग्रामच्या फारूक नगरमध्ये स्थापन केलेली ही बँक एटीएमच्या धर्तीवर काम करेल. अंगठा (पंच टॅक्स) लावून ग्राहकांना येथून धान्य मिळू शकेल.

तीन प्रकारचे धान्य बाहेर येईल

या धान्य मशिनमध्ये टच स्क्रीनसह बायोमेट्रिकप्रणाली देखील स्थापित केली गेलीय. या मशीनमधून धान्य काढून घेण्यासाठी लाभार्थ्यास आधार, रेशन कार्डचा क्रमांक द्यावा लागतो. त्याचवेळी मशीनद्वारे तीन प्रकारची धान्ये काढली जातील, ज्यात गहू, तांदूळ आणि बाजरीचा समावेश आहे.

धान्य आपोआप बॅगमध्ये येणार

ही एक स्वयंचलित मशीन आहे, जी बँकेच्या एटीएमसारखे कार्य करते. बायोमेट्रिकच्या मदतीने आपण त्यातून धान्य काढू शकाल. बायोमेट्रिकद्वारे खात्री करून घेतल्यानंतर सरकारने स्वतःच लाभार्थ्यांना ठरविलेले अन्नधान्य मशीनअंतर्गत बसविलेल्या बॅगमध्ये भरले जाईल. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत स्थापित होणाऱ्या या मशीनला ऑटोमेटेड, मल्टी कमोडिटी, धान्य वितरण मशीन असे म्हणतात. त्याच वेळी अधिकारी अंकित सूद म्हणाले की, या मशीनमुळे धान्यात काही गडबड होणार नाही.

संबंधित बातम्या

‘या’ नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा

LIC IPOसंदर्भात सरकार 3 दिवसांत घेणार दोन मोठे निर्णय, जाणून घ्या IPO कधी येणार?

Good news! Now remove the ration from the ATM in just 5 minutes with your thumb, learn the procedure

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.