याला म्हणतात नशीब! नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याला 300 टक्के पगारवाढ

Google Salary | गुगलचा कर्मचारी कंपनी सोडून जाण्याच्या तयारीत होता. गुगलने तसा ही अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्याबाबतीत वेगळं काही घडणे अपेक्षित नव्हते. पण गुगलने या कर्मचाऱ्याला कंपनी सोडून जाऊ नये यासाठी 300 टक्के पगारवाढ दिली. हा सर्वांसाठी धक्का आहे.

याला म्हणतात नशीब! नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याला 300 टक्के पगारवाढ
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 3:33 PM

नवी दिल्ली | 20 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलमध्ये नोकर कपातीची चर्चा जगभर रंगली आहे. पण यावेळी प्रकरण अगदीच वेगळं आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला आहे. गुगलमधील एका कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. आयआयटी मद्रासमधील काही माजी विद्यार्थ्यांनी एआयवर काम करणे स्टार्टअप सुरु केले आहे. त्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी हा कर्मचारी जाणार होता. पण त्यापूर्वीच गुगलने त्याला जोरदार धक्का दिला. गुगलने त्याने नोकरी सोडू नये यासाठी त्याच्या पगारात 300 टक्क्यांची घसघशीत वाढ केली आहे.

गुगलने दिला धक्का

गुगलने अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मध्यंतरी एआयमुळे संकटाच्या चाहुलीविषयी आणि नोकर कपातीविषयी भाष्य केले होते. त्यामुळे काही कर्मचारी कंपनी सोडून इतर ठिकाणी रुजू होत आहे. एका कर्मचाऱ्याला मात्र सूखद धक्का बसला. आयआयटी मद्रासमधील माजी विद्यार्थ्यांनी एक स्टार्टअप सुरु केले आहे. Perplexity AI या स्टार्टअपमध्ये त्याला उमेदवारी करायची होती. ही बाब समजताच गुगलने त्याच्या पगारात 300 टक्क्यांची वाढ करुन त्याला थांबविले.

हे सुद्धा वाचा

AI फर्मच्या सीईओंनी केला खुलासा

बिग टेक्नॉलॉजी पॉडकस्टमध्ये पर्प्लेक्सिटी एआयचे (Perplexity AI) सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी याविषयी खुलासा केला. त्यानुसार, गुगल सध्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्यावर जोर देत आहे. जो कर्मचारी आमची कंपनी रुजू करणार होता. तो गुगल सर्च टीमचा सहकारी होता. त्याचे कंपनीच्या कृत्रिम बुद्धीमत्ता विभागाशी काही घेणे-देणे नव्हते. तरीही कंपनीने त्याला थांबविले. त्यासाठी घसघशीत पगार वाढ दिली. त्यांचे मते, 300 टक्के पगार वाढ थक्क करणारी आहे.

12000 कर्मचाऱ्यांना नारळ

एका कर्मचाऱ्यावर मेहेरबान होणारी गुगल, हे प्रत्येकचे ड्रीम आहे. अनेकांना गुगलसोबत काम करण्याची संधी हवी आहे. पण गुगलने यापूर्वी कर्मचारी कपातीचा धडाका लावला. गुगलने हार्डवेअर, सेंट्रल इंजिनिअरिंग, गुगल असिस्टंट मधील जवळपास 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली. त्यापूर्वी 2023 मध्ये कंपनीने 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता.

Non Stop LIVE Update
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.