AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank of Baroda | ही सरकारी बँक स्वस्त दरात घरे, दुकाने विकणार; आजपासून लिलाव प्रक्रिया सुरू, जाणून घ्या

या बोलीमध्ये सामील झाल्यास आपण स्वप्नातील घर कमी किमतीत खरेदी करू शकता. ही मालमत्ता देशाच्या विविध कोपऱ्यात आहे.

Bank of Baroda | ही सरकारी बँक स्वस्त दरात घरे, दुकाने विकणार; आजपासून लिलाव प्रक्रिया सुरू, जाणून घ्या
आता घर खरेदी करणे आहे सर्वाधिक फायदेशीर; जाणून घ्या याचे कारण
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 28, 2021 | 9:05 AM
Share

नवी दिल्लीः BoB Mega E-Auction: बँक ऑफ बडोदाकडून मेगा ऑनलाईन लिलावाद्वारे स्वस्त घर खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. 28 जुलै रोजी बँकेमार्फत मेगा ई-लिलावाचे आयोजन केले जात आहे. या बोलीमध्ये सामील झाल्यास आपण स्वप्नातील घर कमी किमतीत खरेदी करू शकता. ही मालमत्ता देशाच्या विविध कोपऱ्यात आहे.

ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँक आपल्या वतीने कर्जही देते

बँक ऑफ बडोदाने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली. ट्विटनुसार बँक घर, फ्लॅट, ऑफिस स्पेस, जमीन प्लॉट आणि औद्योगिक मालमत्तांचा लिलाव करणार आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँक आपल्या वतीने कर्जही देते. याशिवाय ताबाही त्वरित मिळणार आहे, तसेच या सर्व मालमत्ता कोणत्याही कर्जाखाली नाहीत. याचा अर्थ असा कोणताही कायदेशीर वाद संबंधित नाही.

आपल्या आवडीची मालमत्ता स्क्रीनवर असेल

Https://www.bankofbaroda.in/property-search.htm या लिंकवर जाऊन ज्या शहरांमध्ये आपण मालमत्ता खरेदी करू इच्छित आहात त्याबद्दल प्रथम शोधू शकता. येथे प्रथम राज्य निवडा, त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यात मालमत्ता शोधत आहात, नंतर शहराचे नाव, पिन कोड, मालमत्तेचा प्रकार, ताबा प्रकार, मालकीचा प्रकार, किंमत श्रेणी आणि इतर माहिती प्रविष्ट करा आणि शोधा. आपल्या आवडीची मालमत्ता स्क्रीनवर असेल. त्यानंतर आपण पुढील प्रक्रियेस पुढे जाऊ शकता.

बँक कोणत्या मालमत्तेचा लिलाव करते?

ज्या लोकांना कर्जाच्या रूपात पैसे देते, त्याकरिता हमी म्हणून त्यांची निवासी मालमत्ता किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी तारण ठेवते. जर कर्जदार कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असेल तर अशा परिस्थितीत बँक दिलेली कर्जे वसूल करण्यासाठी त्याच्या तारण मालमत्तेचा लिलाव करते. याबाबत बँकेच्या संबंधित शाखा वर्तमानपत्र आणि अन्य माध्यमांद्वारे जाहिराती प्रसिद्ध करतात.

IBAPI च्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल

लिलावासाठी बँकांनी एक सामान्य प्लॅटफॉर्म तयार केलेय, ज्यास IBAPI (इंडियन बँक्स लिलाव तारण मालमत्ता माहिती) असे नाव देण्यात आलेय. त्याच्या वेबसाइटची लिंक https://ibapi.in/ आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार येत्या सात दिवसांत 742 निवासी मालमत्ता, 271 व्यावसायिक मालमत्ता आणि 145 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव होणार आहे. हे प्लॅटफॉर्म वित्तीय सेवा विभागाचा (DFS) उपक्रम आहे.

बोली लावण्यापूर्वी प्रक्रिया जाणून घ्या

जर तुम्हाला अशी प्रॉपर्टी खरेदी करण्याची आवड असेल तर प्रथम तुम्हाला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने नोंदणी करावी लागेल. त्यानंतर निविदादारास त्यांचे केवायसी कागदपत्र अपलोड करावे लागतील जे नंतर सत्यापित केले जातील. यानंतर EMD (Earnest Money Deposit) रक्कम जमा करावी लागेल. ही ठेव ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही करता येते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इच्छुक नोंदणीकृत निविदाकार निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.

संबंधित बातम्या

LPG cylinder Booking: ‘या’ अ‍ॅपसह गॅस सिलिंडर बुक करा, बंपर कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या फायदा

29 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत फक्त 5000 रुपये गुंतवा, तुम्हाला मोठा फायदा होणार, पण कसा?

government bank will sell houses, shops at cheaper rates, auction process starts from today, find out

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ