AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदम सोप्या पद्धतीत तुमची ‘डिजिटल सही’ कशी बनवाल? जाणून घ्या

डिजिटल युगात सरकारी कामे, टॅक्स रिटर्न, कंपनीची कागदपत्रे यासाठी ‘डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC)’ महत्त्वाचे आहे. हे ओळखीचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असून, कागदपत्रांची सुरक्षितता आणि पडताळणी सुनिश्चित करते. तर चला, आज पाहूया या 'डिजिटल सही'चं बनवण्याची सोपी पद्धत!

एकदम सोप्या पद्धतीत तुमची 'डिजिटल सही' कशी बनवाल? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 13, 2025 | 6:35 PM

आजकाल सगळं काही डिजिटल होत चाललं आहे. अशावेळी आपल्या सहीलाही डिजिटल स्वरूप मिळणं गरजेचं झालं आहे. कागदावर आपण हाताने सही करतो, पण ऑनलाइन जगात किंवा अनेक कायदेशीर कामांसाठी आता ‘Digital Signature Certificate (DSC)’ लागतं. हाताने केलेल्या सहीची नक्कल करणं सोपं असू शकतं, पण डिजिटल सहीची नक्कल करणं तितकं सोपं नाही, कारण ती खूप सुरक्षित असते. यामुळे कागदपत्रांची पडताळणी सोपी, जलद आणि सुरक्षित होते.

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे तुमच्या ओळखीचा एक इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे, जो एका पेन ड्राईव्हसारख्या डिव्हाइसमध्ये साठवलेला असतो. जेव्हा तुम्ही एखादं डिजिटल डॉक्युमेंट या सहीने प्रमाणित करता, तेव्हा ते डॉक्युमेंट सुरक्षित होतं आणि त्यात कोणी बदल करू शकत नाही, तसेच सही करणारी व्यक्ती तीच आहे याची खात्री पटते. डिजिटल सहीचा वापर प्रामुख्याने इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन भरणे, कंपनीशी संबंधित कायदेशीर कामं, E-tendering प्रक्रियेत भाग घेणे, GST संबंधित कामांसाठी आणि अनेक सरकारी पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी व कागदपत्रं सबमिट करण्यासाठी होतो.

डिजिटल सही कशी मिळवायची?

स्टेप 1 : अधिकृत सर्टिफिकेट अथॉरिटीच्या वेबसाइटवर जा.

हे सुद्धा वाचा

स्टेप 2 : Individual किंवा Organization साठी DSC चे फॉर्म भरा.

स्टेप 3 : Aadhaar/eKYC किंवा पॅन कार्ड, फोटो, पत्त्याचा पुरावा यासारखी कागदपत्रं अपलोड करा.

स्टेप 4 : eKYC किंवा व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.

स्टेप 5: शुल्क भरल्यानंतर तुम्हाला DSC USB टोकन किंवा डाउनलोड सर्टिफिकेट मिळेल.

PDF फाईलवर डिजिटल सही कशी करायची?

Adobe Acrobat Reader उघडा , Tools वर जा , Fill & Sign वर क्लिक करा.

“Sign” बटणावर क्लिक करून “Add Signature” निवडा.

तुमची सही टाइप, ड्रॉ किंवा इमेज म्हणून अपलोड करू शकता.

सही योग्य ठिकाणी ठेवून “Apply” करा.

डिजिटल सिग्नेचर बनवण्याचा खर्च साधारणपणे ₹१००० पर्यंत असू शकतो. हा खर्च DSC चा क्लास, त्याची वैधता आणि तुम्ही निवडलेल्या सर्टिफाइंग अथॉरिटीवर अवलंबून असतो.

डिजिटल सहीचा उपयोग कुठे होतो?

डिजिटल सहीचा उपयोग अनेक महत्त्वाच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये केला जातो. सर्वप्रथम, आयकर विभागाकडे आयटीआर (Income Tax Return) ऑनलाइन फाईल करताना डिजिटल सही आवश्यक असते, विशेषतः व्यवसायिक किंवा कंपन्यांसाठी. तसेच, ई-टेंडरिंग प्रक्रियेत किंवा सरकारी कंत्राटांसाठी अर्ज करताना, डिजिटल सिग्नेचरद्वारे दस्तऐवज सादर करणे अनिवार्य असते. जीएसटी (GST) नोंदणीसाठी, कॉर्पोरेट कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना, लॉजिस्टिक किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये डिजिटल सहीचा वापर प्रामुख्याने केला जातो. याशिवाय, विविध सरकारी पोर्टल्सवरील सेवांचा लाभ घेताना अधिकृत ओळख दर्शवण्यासाठीही डिजिटल सही उपयुक्त ठरते. त्यामुळे, डिजिटल सही ही केवळ एक सुलभता नव्हे, तर एक सुरक्षित आणि कायदेशीर ओळख सिद्ध करणारे प्रभावी माध्यम आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.