AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adani Group : हिंडनबर्गचे पुन्हा मानगुटीवर भूत, डेलॉइटच्या राजीनाम्याने वाढले अदानी समूहाचे टेन्शन

Adani Group : अदानी पोर्टच्या डेलॉईट या लेखापरीक्षकाने पदावरुन राजीनामा दिला. त्यावरुन हिंडनबर्ग रिसर्चने सवाल उभे केले आहेत. हिंडनबर्गने या राजीनाम्याचे भांडवल केले आहे. त्यामुळे अदानी समूहासमोरील अडचणी वाढताना दिसत आहे.

Adani Group : हिंडनबर्गचे पुन्हा मानगुटीवर भूत, डेलॉइटच्या राजीनाम्याने वाढले अदानी समूहाचे टेन्शन
| Updated on: Aug 13, 2023 | 2:30 PM
Share

नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : यावर्षाच्या सुरुवातीला, 23 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) अदानी समूहाविरोधात बॉम्ब टाकला होता. त्यानंतर अदानी समूहाला जबरदस्त हादरा बसला. त्यानंतर गौतम अदानी यांच्या समूहाचे शेअर घसरले. गुंतवणूकदारांनी माघार घेतली. दोन महिने घसरणीचे सत्र सुरु होते. अदानी समूहाने अनेक घोळ घातल्याचा आरोप हिंडनबर्गने केला होता. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन चे लेखापरीक्षण डेलॉईटकडे (Deloitte Haskins)आहे. कंपनीने या पदावरुन राजीनामा दिला. ही बाब गंभीर असल्याचे हिंडनबर्गने नमूद करत पुन्हा हल्लाबोल केला. डेलॉईट ही जगातील टॉप लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. 2017 पासून अदानी समूहाच्या लेखापरीक्षणाची (Auditing) जबाबदारी डेलॉईटकडे होती.

नवीन लेखापरीक्षकाची नियुक्ती

डेलॉईटने अदानी पोर्टच्या ऑडिटर पदाचा राजीनामा देताच लागलीच नवीन ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली. अदानी समूहाने याचा झटपट निर्णय घेतला. ‘एमएसकेए अँड असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटेंट्स’ या कंपनीची लेखापरीक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली.

कार्यकाळात वाढ

डेलॉईट या कंपनीला अदानी पोर्टच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी 2017 मध्ये सोपविण्यात आली होती. जुलै 2022 मध्ये पुढील पाच वर्षांसाठी लेखापरीक्षणाचा कालावधी वाढविण्यात आला होता. पण अचानक माशी शिंकली आणि कंपनीने लेखापरीक्षणाच्या जबाबदारीतून स्वतःची मुक्तता करुन घेतली, यावर हिंडनबर्गने बोट ठेवले आहे.

आग आणि धूर संगटचं

डेलॉईटने ऑडिटर पदाचा दिलेला राजीनामा सहज गोष्ट नाही. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गला यामध्ये दुसराच वास येत आहे. लेखापरीक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यात अदानी समूहाला अपयश आले आहे. यापूर्वी अदानी समूहाविषयी केलेल्या आरोपांना यामुळे पुष्टी मिळत असल्याचा अप्रत्यक्ष टोला हिंडनबर्गने लगावला आहे.

तीन व्यवहारांवर प्रश्न

या वर्षी जानेवारी महिन्यात हिंडनबर्गने तीन व्यवहारांवर सवाल उपस्थित केले होते. त्या प्रश्नांची उत्तरे समूहाने दिली नसल्याचा दावा हिंडनबर्गने केला आहे. डेलॉईटला लेखापरीक्षण करताना या तीन व्यवहारांमुळेच अडचण आली असावी आणि त्यांनी चिंता व्यक्त केली असावी, असा अंदाज अमेरिकन फर्मने व्यक्त केला आहे. व्यवहारांवर सहमती न झाल्यानेच डेलॉईटने पदाचा राजीनामा दिल्याचा बॉम्ब हिंडनबर्गने टाकला.

काहीच लपविले नाही

ऑडिट समितीचे अध्यक्ष गोपाल कृष्ण पिल्लई यांनी याप्रकरणी कंपनीची बाजू मांडली. डेलॉईटने यापूर्वीच राजीनाम्याचा विषय मांडला होता. डेलॉईट लेखापरीक्षक पदावर राहू इच्छित नव्हती. त्यामुळे दोघांनी या विषयावर चर्चा केली. चर्चेअंती ठरल्याप्रमाणए डेलॉईटने राजीनामा दिला, असा दावा अदानी कंपनीकडून करण्यात आला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?