Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या शहरात घर खरेदी करणे अवघड, किंमती वाढल्या झटपट, असा बसला फटका

House Price Increase : देशातील बड्या शहरात, मेट्रो शहरात घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वाधिक वाढ ही बेंगळुरुमध्ये झाली आहे. तर चेन्नई पण मागे नाही. या यादीत मुंबई, पुणेचा कितवा आहे क्रमांक, किती वाढली येथे किंमत

मोठ्या शहरात घर खरेदी करणे अवघड, किंमती वाढल्या झटपट, असा बसला फटका
घरांची विक्री वाढली
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 5:22 PM

देशातील बड्या शहरातील मालमत्तांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तर घरांच्या किंमती पण वाढल्या आहेत. क्रेडाई कोलियर्स लायसेस फोरासच्या (CREDAI Colliers Liases Foras) अहवालानुसार, भारतातील 8 शहरात घर खरेदी करणे अत्यंत महाग झाले आहे. 2024 मधील पहिल्या तिमाहीतील आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यानुसार, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरु, अहमदाबाद, पुणे, चेन्नई, कोलकत्ता, मुंबई उपनगर, हैदराबाद आणि पुण्यात घराचं स्वप्न महागलं आहे.

किती टक्के वाढ?

बेंगळुरुमध्ये सर्वाधिक 19 टक्के तर चेन्नईत सर्वात कमी 4 टक्के घरांच्या किंमतीत वाढ नोंदविण्यात आली. याशिवाय दिल्ली-एनसीआर, बेंगळुरु, अहमदाबाद, पुणे या शहरात घराच्या किंमती भडकल्या आहेत. इतर शहरात 2 ते 7 टक्क्यांपर्यंत घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

घर खरेदीसाठी या शहरात मोजा जादा पैसा

  1. वाढत्या महागाईने अगोदरच सर्वसामान्य बेजार झाले आहेत. जे लोक नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांच्या खिशावर आता ताण वाढला आहे. भारताचे सिलीकॉन व्हॅली म्हटल्या जाणाऱ्या बेंगळुरुतील रीफेरी आणि आऊटर ईस्ट मायक्रो मार्केटचा भाव एका वर्षात 32 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
  2. दिल्ली एनसीआरमध्ये सातत्याने घराची मागणी वाढत आहे. या ठिकाणी घरांच्या किंमतीत 16 टक्क्यांपर्यंत उसळी दिसून आली. द्वारका एक्सप्रेसवेच्या जवळपास घर घेणे अत्यंत महागले आहे. या भागात किंमती 23 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. या वाढलेल्या किंमतींनी अहमदाबादला पण सोडले नाही. या शहरात घराच्या किंमतीत 13 टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून आली.
  3. पुणे शहरात पण घराच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या उपनगरात मात्र या शहरांच्या तुलनेत घरांच्या किंमती एकदम वाढलेल्या नाहीत. या किंमती 6 टक्क्यांच्या जवळपास वाढल्या आहेत. तर नवीन आयटी हब म्हणून उदयास येत असलेल्या हैदराबादमध्ये 9 टक्क्यांपर्यंत घरांच्या किंमती वाढलेल्या आहेत.

यापूर्वी पण वाढले होते भाव

जेव्हा 2023 च्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे समोर आले. तेव्हा देशातील काही शहरातील घरांच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. कोलकत्तामध्ये तेव्हा घराच्या किंमतीत 15 टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली. त्यावर्षी देशाची राजधानी दिल्लीत 14 टक्के घरं महाग झाली होती. त्यावेळी पण सर्वाधिक महागडी घरं द्वारका एक्सप्रेसवे जवळच होती. ज्या गतीने घराच्या किंमती वाढत आहे, त्यावरुन या मोठ्या शहरात स्वतःचे घर घेणे अशक्य होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.