AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची आवडती इलेक्ट्रिक कार स्वस्तात कशी आणि कुठून खरेदी कराल, सरकार करणार मदत

वास्तविक ई-अमृत पोर्टलचा उद्देश लोकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागरूक करणे हा आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे फायदे ग्राहकांना पटवून देण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून भारतात सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

तुमची आवडती इलेक्ट्रिक कार स्वस्तात कशी आणि कुठून खरेदी कराल, सरकार करणार मदत
इलेक्ट्रिक कार
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 7:26 AM
Share

नवी दिल्लीः यूके येथे COP26 शिखर परिषदेत इलेक्ट्रिक वाहनांवर (EVs) ई-अमृत हे वेब पोर्टल सुरू केलेय, असं भारताने बुधवारी ग्लासगोमध्ये सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित सर्व माहितीसाठी हे एक-स्टॉप डेस्टिनेशन किंवा पोर्टल आहे. जिथे इलेक्ट्रिक वाहने (EV), त्यांची खरेदी, गुंतवणुकीच्या संधी, धोरणे, सबसिडी यासह सर्व माहिती मिळेल. हे पोर्टल NITI आयोगाने ब्रिटिश सरकारसोबत सहयोगात्मक ज्ञान विनिमय कार्यक्रमांतर्गत सुरू केले. याशिवाय हे पोर्टल यूके-भारत संयुक्त रोडमॅप 2030 चा भाग आहे, ज्यावर या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली.

ई-अमृत पोर्टल म्हणजे काय?

वास्तविक ई-अमृत पोर्टलचा उद्देश लोकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागरूक करणे हा आहे. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे फायदे ग्राहकांना पटवून देण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून भारतात सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. एकीकडे सरकारही याबाबत लोकांना जागरुक करत असताना अनेक ठिकाणी खरेदीसाठी अनुदान जाहीर करण्यात आले आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक त्याकडे वळतील. भारताने वाहतूक कार्बनमुक्त करण्यासाठी आणि देशभरात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी अनेक पुढाकार घेतलेत. FAME आणि PLI सारख्या योजना इलेक्ट्रिक वाहने (EVs) लवकर अंगीकारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी विशेषतः महत्त्वाच्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज

इलेक्ट्रिक वाहने घेण्याकडे अनेकांचा कल वाढल्याचे काही काळापासून दिसून येत आहे. येत्या काळात देशात इलेक्ट्रिक वाहने पूर्णपणे आपले पाय रोवतील. कारण त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे लोक त्याचा अवलंब करत आहेत. ई-अमृत पोर्टलचा उद्देश हा देखील आहे की, लोकांना योग्य माहिती मिळावी, तसेच कुठे आणि कोणावर गुंतवणूक करणे फायदेशीर आहे, ही सर्व माहिती मिळू शकेल. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. कोणतीही अडचण न होता संपूर्ण प्रक्रिया सुलभ होईल. आणि ग्राहकांना जागरुक करण्यासोबतच, इलेक्ट्रिक वाहनांना गती देण्याचा सरकारचा उपक्रम आहे. म्हणूनच सरकार इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, EVs बाबत ग्राहकांना विम्याचा पर्यायही देत ​​आहे. जेणेकरून अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतील.

संबंधित बातम्या

5G Spectrum Auction: 5G स्पेक्ट्रमचा कधी लिलाव होणार, दूरसंचार मंत्री म्हणाले…

रेल्वे लवकरच Special Trains थांबवणार; सामान्य भाडे लागू होणार

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.