१० हजारांची SIP केल्यास तुम्ही किती वर्षांत करोडपती बनाल? वाचा सविस्तर…
एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे असते. नियमित गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजामुळे रक्कम हळूहळू वाढत जाते.आज आपण दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यात किती दिवसांत करोडपती बनू शकतो ते जाणून घेऊयात.

शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याऐवजी मध्यमवर्गीय लोक म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे कमी जोखमीचे असते. तसेच एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावाही मिळतो, कारण नियमित गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजामुळे रक्कम हळूहळू वाढत जाते. त्यामुळे तुम्ही नियमित गुंतवणूक करत असाल तर तुम्ही आगामी काळात करोडपती बनू शकता.
एसआयपीद्वारे करोडपती बनण्याची संधी
तुम्ही नोकरदार असाल तर आर्थिक तज्ज्ञ तुम्हाला पहिल्या पगारापासून गुंगवणूकीचा सल्ला देतात. मात्र तुम्ही अजूनही गुंतवणूक करत नसाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीद्वारे १२ टक्के परतावा सहज उपलब्ध आहे. आज आपण दरमहा १० हजार रुपयांची एसआयपी केल्यास किती दिवसांमध्ये करोडपती बनू शकता याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
१०,००० रुपयांच्या एसआयपीमधून किती वर्षांत १ कोटी मिळतील?
तुम्ही दरमहा १०,००० रुपये म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये जमा केले आणि तुम्हाला वार्षिक १२% परतावा मिळाला तर तुम्ही २१ वर्षांत १,०४,३०,०६७ रुपये कमवू शकता. या एकूण रकमेत, २५,२०,००० रुपये ही तुमची गुंतवणूक रक्कम असेल. तर ७९,१०,०६७ रुपये हे व्याज असे. जर तुम्हाला १५ टक्के वार्षिक परतावा मिळाला तर तुम्ही फक्त १५ वर्षांत १,१३,३४,५०५ रुपये कमवू शकता. यामध्ये ५७,०९,६४९ गुंतवणूक रक्कम असेल आणि ५६,२४,८५६ व्याज असेल.
१५,००० रुपयांच्या एसआयपीमधून किती वर्षांत १ कोटी जमा होतील?
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा १५,००० रुपये जमा केले आणि तुम्हाला १२ टक्के वार्षिक परतावा मिळाला तर तुम्ही १८ वर्षांत १,०६,७५,९२९ रुपये कमवू शकता. यामध्ये ३२,४०,००० रुपये गुंतवणूक रक्कम आणि ७४,३५,९२९ रुपये व्याज असेल. तसेच जर तुम्हाला १५ टक्के वार्षिक परतावा मिळाला तर १३ वर्षांत १,१४,२१,५१२ रुपये मिळतील.
टीप – वरील लेखात दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे आर्थिक जोखमीचे काम आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. वरील लेख वाचून एखाद्याने गुंतवणूक केल्यास, आणि त्याला आर्थिक फटका बसल्यास टीव्ही ९ मराठी जबाबदार असणार नाही.
