AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 30 व्या वर्षापासून गुंतवणूक किती करावी? काय फॉर्म्युला? जाणून घ्या

तुम्ही वयाच्या तिशीत असाल तर ही बातमी आधी वाचा. ३० व्या वर्षी गुंतवणूक करण्यासाठी काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. तुम्ही देखील याच वयात चांगली गुंतवणूक केल्यास लवकर श्रीमंत होऊ शकाल. यासाठी काहीही मोठे करायचे नाही, फक्त कोणताही खंड न पडू देता काही वर्ष गुंतवणूक करायची, जाणून घेऊया.

वयाच्या 30 व्या वर्षापासून गुंतवणूक किती करावी? काय फॉर्म्युला? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Mar 27, 2026 | 4:58 PM
Share

तुम्ही बचत करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. वयाच्या 30 व्या वर्षी आर्थिक जबाबदाऱ्या वाढू लागतात. लग्न, मुलांचे शिक्षण, घराचे स्वप्न आणि स्वतःचे निवृत्ती वेतन अशा अनेक गोष्टींचे नियोजन याच काळात करावे लागते. म्हणूनच, 30 व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करणे हा एक ‘गोल्डन पीरियड’ मानला जातो. 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यासाठी काही महत्त्वाचे फॉर्म्युले आणि सविस्तर माहिती दिली आहे.

गुंतवणुकीचा सुवर्ण नियम: 50-30-20 नियम

गुंतवणुकीसाठी हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी फॉर्म्युला आहे. तुमच्या निव्वळ उत्पन्नाची विभागणी खालीलप्रमाणे करा

50 टक्के गरजा: घरभाडे, रेशन, लाईट बिल, औषधे यांसारख्या आवश्यक गोष्टींवर तुमच्या पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करू नका.

30 टक्के इच्छा: हॉटेलिंग, फिरणे, नवीन गॅजेट्स किंवा छंद यांवर 30 टक्के खर्च करा.

20 टक्के गुंतवणूक: किमान 20 टक्के रक्कम दरमहा गुंतवलीच पाहिजे. जर तुमची कर्जे (EMI) कमी असतील, तर ही गुंतवणूक 30 टक्केपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा.

वयानुसार गुंतवणुकीचा फॉर्म्युला: 100 उणे वय

हा नियम तुम्हाला तुमचे पैसे ‘इक्विटी’ (शेअर बाजार/म्युच्युअल फंड) आणि ‘डेट’ (FD/PPF) मध्ये कसे विभागून ठेवावे हे सांगतो.

फॉर्म्युला: 100 – 30 (तुमचे वय) = 70.

अर्थ: तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी 70 टक्के रक्कम इक्विटीमध्ये (ज्यामध्ये जास्त परतावा मिळतो) आणि उर्वरित 30 टक्के रक्कम सुरक्षित पर्यायांमध्ये (FD, गोल्ड, बॉन्ड्स) असावी. ३० व्या वर्षी तुमच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे इक्विटीमधील गुंतवणूक भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकते.

इमर्जन्सी फंड: पहिला टप्पा

गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी, तुमच्याकडे किमान 6 महिन्यांच्या खर्चासाठी आपत्कालीन निधी असणे आवश्यक आहे. जर तुमचा महिन्याचा खर्च 40 हजार असेल, तर किमान 2.40 लाख रुपये लिक्विड फंड किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये वेगळे ठेवा. यामुळे नोकरी जाणे किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी तुमची गुंतवणूक मोडण्याची वेळ येत नाही.

4. गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

30 व्या वर्षी तुमच्याकडे 20-25 वर्षांचा कालावधी असतो, त्यामुळे चक्रवाढ व्याजाचा (Power of Compounding) फायदा घेण्यासाठी

खालील पर्याय निवडा:

SIP: दरमहा किमान 5,000 ते 10,000 रुपयांची SIP सुरू करा. दीर्घकाळात (15-20 वर्ष) 15 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाऊ शकते.

PPF: कर सवलत आणि सुरक्षिततेसाठी वर्षाला किमान 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करा.

Term & Health Insurance: कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा टर्म इन्शुरन्स आणि पुरेसा हेल्थ इन्शुरन्स असणे ही सुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच आहे.

5. महागाईचा विचार करा

आजच्या 1 लाखाची किंमत 10 वर्षांनंतर खूप कमी झालेली असेल. त्यामुळे केवळ सेविंग अकाउंट किंवा FD मध्ये पैसे ठेवण्याऐवजी अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे परतावा महागाई दरापेक्षा (साधारण 6-7 टक्के) जास्त असेल.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ