AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI e-Mudra: झटपट कर्ज हवंय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SBI e-Mudra| कोणत्याही लघू उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी यंत्रसामुग्रीची गरज असेल तर SBI e-Mudra योजनेतंर्गत त्याला कर्ज मिळू शकते. लहान उत्पादक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार अशांना या कर्जाचा लाभ घेता येतो.

SBI e-Mudra: झटपट कर्ज हवंय, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मुद्रा लोन
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 11:03 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारने 2015 साली देशातील लघू उद्योजकांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना (Mudra Loan) सुरु केली होती. या योजनेतंर्गत नॉन-कॉर्पोरेशन, नॉन फार्म आणि मायक्रो एन्टरप्रायझेसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही कोणतीही सरकारी बँक, बिगरसरकारी वित्तीय संस्था, ग्रामीण बँका आणि लहान बँकांमध्ये अर्ज करु शकता. (SBI E mudra loan eligibility documents process and all details)

कोणत्याही लघू उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी यंत्रसामुग्रीची गरज असेल तर SBI e-Mudra योजनेतंर्गत त्याला कर्ज मिळू शकते. लहान उत्पादक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार अशांना या कर्जाचा लाभ घेता येतो. SBI बँकेत तुमचे खाते असेल तर हे कर्ज तुम्हाला आणखी झटपट मिळू शकते.

SBI e-Mudra कर्जाचे फायदे काय?

SBI मुद्रा कार्डावर तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. हे कार्ड डेबिट कार्डप्रमाणे काम करते. तसेच वेळ पडल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डाप्रमाणेही याचा वापर करता येतो. SBI मुद्रा कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. तसेच यासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही. या योजनेतंर्गत तुम्हाला बिझनेस लोनपेक्षा स्वस्त दरात कर्जपुरवठा केला जातो.

महिला उद्योजकांना डिस्काऊंट

SBI मुद्रा कर्ज हे महिलांना कमी व्याजदराने दिले जाते. या योजनेतंर्गत कर्जावर 08.40 ते 12.35 टक्के इतका व्याजदर आकारला जातो. तुमचा उद्योग चांगला सुरु असेल तर सहा महिन्यांचे व्याजही माफ केले जाते. SBI मुद्रा कर्ज हे 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना वितरीत केले जाते.

SBI e-Mudra कर्ज मिळवण्याची ऑनलाईन पद्धत

SBI e-Mudra लोन हवे असल्यास तुम्ही नजीकच्या शाखेशी संपर्क साधू शकता. अन्यथा ऑनलाईन पद्धतीनेही तुम्हाला हे कर्ज मिळवता येईल. त्यासाठी SBI e-Mudra च्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर सूचनांचे पालन करत सर्व तपशील भरावा. यानंतर एक अर्ज भरून तो सबमिट करावा. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.

संबंधित बातम्या: 

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा

EXCLUSIVE: ऑपरेशन मुद्रा – मुद्रा लोन योजनेचा बट्ट्याबोळ

बिझनेसची भन्नाट आयडिया, डेअरी सुरु करा, गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त

(SBI E mudra loan eligibility documents process and all details)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.