बिझनेसची भन्नाट आयडिया, डेअरी सुरु करा, गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त

दुग्धजन्य पदार्थ असे आहेत की ज्यांचा दररोज वापर केला जातो. यामुळे यामध्ये जास्त नफा आहे. अशात दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात तुम्ही फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतच दरमहा 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता.

बिझनेसची भन्नाट आयडिया, डेअरी सुरु करा, गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त
अमूल दूध महागले; प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 12:13 PM

मुंबई : देशात असे असंख्य व्यवसाय आहेत जे तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता आणि त्यातून बक्कळ पैसा कमवू शकता. यातलाच एक व्यवसाय म्हणजे डेअरी उत्पादनाचा व्यवसाय आहे. दुग्धजन्य पदार्थ असे आहेत की ज्यांचा दररोज वापर केला जातो. यामुळे यामध्ये जास्त नफा आहे. अशात दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात तुम्ही फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतच दरमहा 70 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकता. (start dairy business you can earn good money from business here know the details)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारही तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे तुम्हीही जर हा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहे. तर जाणून घेऊयात संपूर्ण प्रक्रिया….

मुद्रा कर्ज योजनेंतर्गत मिळेल कर्ज

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक धोरणं पक्कं असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळीच पैशांची जुळवणी करणं महत्त्वाचं आहे. यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, मोदी सरकारच्या पंतप्रधान मुद्रा लोन योजनेमुळे तुम्ही सहज व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता.

एकूण गुंतवणुकीच्या 70% दिलं जाईल कर्ज

जर तुम्हालाही या व्यवसायाला सुरुवात करायची असेल आणि यासाठी तुम्ही कर्ज घेणार असाल तर मुद्रा कर्जामधून बँकेला एकूण खर्चाच्या 70 टक्के रक्कम मिळेल.

5 लाख रुपये करावे लागतील खर्च

खरंतर, प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार हा व्यवसाय 16 लाख 50 हजार रुपयांपर्यंत तयार केला जाऊ शकतो. पण यामध्ये एखाद्या व्यक्तीला फक्त 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

असा असेल प्रोजेक्ट

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रकल्पानुसार, या व्यवसायात एका वर्षात 75 हजार लिटर दुधाची विक्री होऊ शकते. इतकंच नाहीतर 36 हजार लिटर दही, 90 हजार लिटर लोणी आणि 4500 किलो तूपही विकलं जाऊ शकतं. यामुळे याचा जर हिशोब केला तर सुमारे 82 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल व्यवसायात तुम्हाला करता येईल. ज्यामध्ये सुमारे 74 लाख रुपये खर्च येईल. यामध्ये तुम्ही 14 टक्के व्याज कपात करूनही तब्बल 8 लाखांची बचत करू शकता.

या व्यवसायाला सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1000 चौरस फूट जागा आवश्यक आहे. ज्यामध्ये 500 चौरस फूट जागा काम करण्यासाठी, रेफ्रिजरेशन 150 चौरस फूट, वॉशिंग 150 चौरस फूट, ऑफिस, शौचालय आणि इतर सुविधांसाठी 100 चौरस फूट जागा आवश्यक आहे. (start dairy business you can earn good money from business here know the details)

संबंधित बातम्या – 

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी Good News! गरज पडली तर जास्तीचे पैसे देणार बँक, वाचा सविस्तर

SBI, HDFC सह ‘या’ बँकांची स्पेशल FD स्‍कीम, 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी

कमी पैशांमध्ये जास्त परतावा देणाऱ्या LIC च्या धमाकेदार योजना; फायदे वाचून करा गुंतवणूक

(start dairy business you can earn good money from business here know the details)

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.