आपल्याजवळ असलेले पॅन कार्ड खरे आहे की बनावट, काही मिनिटांत शोधून काढा

आपण वापरत असलेले पॅनकार्ड वास्तविक आहे की बनावट हे आपल्याला माहिती नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आपण काही मिनिटांत हे शोधू शकता.

आपल्याजवळ असलेले पॅन कार्ड खरे आहे की बनावट, काही मिनिटांत शोधून काढा
PAN card
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 4:48 PM

नवी दिल्लीः बँकिंगपासून ते इतर महत्त्वाच्या आर्थिक कामांपर्यंत पॅनकार्ड असणे आजकाल खूप महत्त्वाचे आहे. पण आजकाल पॅन क्रमांकाचादेखील बराच गैरवापर केला जात आहे, ज्यामुळे आपण फसवणुकीचे शिकार होऊ शकता. आजकाल बनावट पॅनकार्डचा ट्रेंडही जोरात सुरू आहे, त्यामुळे आपण वापरत असलेले पॅनकार्ड वास्तविक आहे की बनावट हे आपल्याला माहिती नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आपण काही मिनिटांत हे शोधू शकता. तर त्याची प्रक्रिया काय आहे, संपूर्ण तपशील जाणून घ्या. (How To Check Pan Card Real Or Fake Know Easy Process To Verify Its Originality)

पॅन कार्डची सत्यता तपासा

1. पॅनकार्डची सत्यता तपासण्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन लॉगिन करा. 2. येथे तुम्हाला वरच्या बाजूला ‘आपले पॅन तपशील सत्यापित करा’ या लिंकवर क्लिक करावे लागेल. 3. आता वापरकर्त्याला पॅनकार्डचा तपशील भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर, पॅनकार्ड धारकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख इत्यादी भरावे लागतील. 4. यानंतर अचूक माहिती भरल्यानंतर पोर्टलवर एक संदेश येईल की भरलेली माहिती तुमच्या पॅनकार्डशी जुळेल की नाही. जर माहिती बरोबर असेल तर पॅनकार्डची सत्यता आपण शोधू शकता.

फसवणूक रोखण्याचा उद्देश

देशव्यापी लॉकडाऊननंतर बनावट पॅनकार्डद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या पॅनकार्डची सत्यता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून आपण प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवरून सहज शोधू शकता. प्राप्तिकर विभाग 10-अंकी ओळख क्रमांक जारी करतो. ज्याद्वारे त्या व्यक्तीची आर्थिक माहिती ट्रॅक करण्यास मदत मिळते. याद्वारे आपण बँक खाते असणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विक्री करणे, कार खरेदी करणे किंवा विक्री करणे, आयटीआर दाखल करणे, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे दागिने खरेदी करणे अशा अनेक गोष्टी करू शकता.

पॅन कार्ड अर्ज प्रक्रिया

पॅन कार्ड मिळविण्यासाठी प्राप्तिकर वेबसाईटवर अर्ज करता येतो. आपण घरी बसून ई पॅन मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल, ज्यामधून ओटीपी जनरेट होईल आणि काही मिनिटांत तुम्हाला ई पॅन देण्यात येईल.

संबंधित बातम्या

Alert! एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना, नेट बँकिंग इतक्या तासांसाठी बंद

Bank Holidays: ‘या’ महिन्यात 11 दिवस बँका बंद, आताच कामे उरका, पटापट तपासा यादी

How To Check Pan Card Real Or Fake Know Easy Process To Verify Its Originality

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.