AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसाठी धोक्याची घंटा? फाईव्ह स्टार हॉटेल बंद, नोकरांचा पगार द्यायलाही पैसा नाही

मुंबईतल्या सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अशा फाईव्ह स्टार हॉटेल पैकी एक Hyatt Regency तात्पुरतं बंद करत असल्याची मॅनेजमेंटनं घोषणा केली आहे. (Hyatt Regency mumbai Suspends operation owner fail to pay Salaries)

मुंबईसाठी धोक्याची घंटा? फाईव्ह स्टार हॉटेल बंद, नोकरांचा पगार द्यायलाही पैसा नाही
मुंबईतल्या सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अशा फाईव्ह स्टार हॉटेल पैकी एक Hyatt Regency तात्पुरतं बंद करत असल्याची मॅनेजमेंटनं घोषणा केली आहे.
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 10:56 AM
Share

मुंबई : मुंबईतल्या सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध अशा फाईव्ह स्टार हॉटेल पैकी एक Hyatt Regency तात्पुरतं बंद करत असल्याची मॅनेजमेंटनं घोषणा केली आहे. ही एक अमेरिकन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटॅलिटी चेन असून मुंबईतलं तिचं युनिट बंद करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे एवढं मोठं हॉटेल बंद होण्याची मुंबईतली तरी ही पहिलीच घटना आहे. या युनिटचे इंडियन मालक एशियन हॉटेल वेस्ट(Asian Hotel West) हे तर कर्मचाऱ्यांची पगारही देऊ शकलेले नाहीत. (Hyatt Regency mumbai Suspends operation owner fail to pay Salaries)

गेल्या वर्षभरापासून फक्त मुंबईच नाही तर जगभरात कोरोनामुळे लॉकडाऊनचं संकटं आहे. त्यामुळेच अनेक उद्योगधंदे कायमचे बंद झालेत. काही दिवाळखोरीत निघाले. आश्चर्य म्हणजे ज्यांचं जगभरात नाव आणि साखळी आहे अशाही काही उद्योगांना घरघर लागली. त्यातलच एक म्हणजे अमेरिकन फाईव्ह स्टार हॉटेल हयात रेजेंसी. याच चेनचं मुंबईतलं युनिट बंद केलं गेलं आहे. कोरोना महामारी आणि त्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊननं हॉटेलचं कंबरडं मोडलं आहे. विशेष म्हणजे ज्यादिवशी लॉकडाऊन उठवला गेला त्याच दिवशी हयात रेजेंसी बंद करण्याची घोषणा केली गेली आहे.

मुंबईतल्या टॉपच्या हॉटेलपैकी एक Hyatt Regency

मुंबईत टाटा, हिल्टन यांच्यासह अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. त्यापैकीच एक हे हयात रेजेंसी आहे. त्यातही ते अमेरिकन असल्यामुळे बॉलीवुड पार्टीज पासून ते इतर सगळ्या कार्यक्रमासाठी हयात रेजेंसीत रेलचेल असायची. हे हॉटेल मुंबई एअरपोर्टच्या जवळ आहे. याच्याच परिसरात ITC Maratha, Hilton Mumbai International असे इतरही फाईव्ह स्टार हॉटेल आहेत. हयातच्याच आसपास JW Marriott, The Lalit आणि The Leela हेही नावाजलेले आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच राजधानीत एवढं मोठं हॉटेल बंद पडत असेल तर पुढे काय वाढून ठेवलंय हे विचार करण्यासारखं आहे.

नोटीसमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

हयात रेजेंसी ही जरी अमेरिकन हॉटेल चेन असली तरी मुंबईतल्या युनिटचे मालक इंडियन आहेत. त्यांचं नाव एशियन हॉटेल्स वेस्ट. हॉटेल तात्पुरतं बंद करताना जी नोटीस दिली आहे, त्यात म्हटलं आहे की, Hyatt Regency कडून फंड आलेला नाही. त्यामुळे पुढच्या आदेशापर्यंत हॉटेल्सचे सगळे ऑपरेशन्स बंद असतील. विशेष म्हणजे फंड नसल्यामुळे हॉटेलचं मॅनजमेंट नोकरांचा पगारही करु शकलेलं नाही.

(Hyatt Regency mumbai Suspends operation owner fail to pay Salaries)

हे ही वाचा :

रेशनकार्डशिवाय 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत कसे मिळवायचे, जाणून घ्या…

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.