आज खरेदी केले 1 किलो सोने तर 2050 मध्ये किती मिळेल किंमत? जाणून घ्या फायदे-तोटे
सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.त्यामुळे आज एक किलो ग्रॅम सोने खरेदी केले तर त्याला साल २०५० पर्यंत किती किंमत मिळेल असा अंदाज केला तर उत्तर काय मिळते हे पाहाणे मजेशीर आहे.

Gold Price : सोन्याला गुंतवणूकीसाठी नेहमीच सुरक्षित आणि भरोसेमंद पर्याय मानला गेला आहे. याचे आकर्षण केवळ याच्या किंमतीतील वाढीपर्यंत मर्यादित नाही. तर आर्थिक अनिश्चितेतही एक विश्वासार्ह साथी म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. यामुळे आज तुम्ही एक किलो सोने जर खरेदी केले तर प्रश्न निर्माण होतो की याची किंमत साल २०२५ पर्यंत नेमकी किती होऊ शकते. आणि गुंतवणूकीसाठी सोने किती महत्वाचे आहे. चला तर सध्याच्या रेट आणि ऐतिहासिक ट्रेंडआधारे याच्या भविष्यात किती फायदा मिळेल ते पाहूयात…
सध्या सोन्याची किंमत काय ?
ऑक्टोबर २०२५ मध्ये भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे ११,९४२ रुपये प्रति ग्रामच्या जवळपास आहे. याचा अर्थ एक किलो म्हणजे १०,००० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे १,१९,४२,००० रुपयांपर्यंत होते. हा दर प्रत्येक शहरानुसार वेगवेगळा आहे आणि विविध बाजारातही दर थोडा वेगळा असू शकतो.परंतू तेवढेच मुल्य असू शकतो.
२०५० पर्यंत सोन्याची किंमत
एका साधारण अंदाजानुसार जर पाहिले तर सध्याचे सोन्याचे दर पहाता सरासरी ८ टक्के वार्षिक वाढीने होते., तर २०५० पर्यंत सोन्याची किंमत सुमारे २५ पट वाढू शकते.याचा अर्थ साल २०२५ मध्ये एक किलो सोन्याची किंमत सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांपर्यंत पोहचू शकते. परंतू जर सोन्याची किंमत १० टक्के वार्षिक दराने वाढल्या तर ४५-५० कोटी रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकते. हा अंदाज केवळ ट्रेंड आणि सरासरी वृद्धी दरावर आधारित आहे. भविष्यात या दरात वाढ किंवा कपात देखील होऊ शकते.
नफा-नुकसानाचा अंदाज
गेल्या काही वर्षात सोन्याच्या किंमतीत लागोपाठ वाढच नोंदली गेली आहे. जी भविष्यातही जारीच रहाण्याची शक्यता आहे. सोने गुंतवणूकीच्या दृष्टीने एक सुरक्षित पर्याय मानला जात आहे.खास करुन आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही सुरक्षित असते. सोन्याच्या किंमती सर्वसाधारणपणे इन्फ्लेशनच्यासोबत वाढतात. ज्यामुळे ते इन्फ्लेशनपासून सुरक्षा देते.
काय होऊ शकते नुकसान?
एक किलो सोन्याला सुरक्षित राहण्यासाठी योग्य स्टोरेज आणि सुरक्षेची गरज आहे.जो याला एक्स्ट्रा खर्चाचे कारण ठरु शकतो. सोन्याला तातडीने रोखीत परिवर्तित करणे कधी – कधी अवघड बनते. खास करुन जास्त दर असताना. अशा वेळी याच्या लाभासह काही तोटेही असतात.
