AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share market : शेअर मार्केटमधून नियमीत उत्पन्न हवंय, तर मग ‘डिव्हिडंड यिल्ड’मध्ये गुंतवणूक करा; समजून घ्या कसा मिळतो परतावा?

परतावा कमी मिळणाऱ्या गुंतवणूकदारांना (investors) जोखिमेची भिती वाटते . म्हणून असे गुंतवणूकदार डिव्हिडंट देणाऱ्या फंडात गुंतवणूक करतात. असे गुंतवणूकदार त्यांच्या कमाईतील एक हिस्सा डिव्हिडंटद्वारे कमावत असतात.

Share market : शेअर मार्केटमधून नियमीत उत्पन्न हवंय, तर मग 'डिव्हिडंड यिल्ड'मध्ये गुंतवणूक करा; समजून घ्या कसा मिळतो परतावा?
| Updated on: Jul 24, 2022 | 12:29 PM
Share

शेअर बाजारात (Share market) चांगला फायदा मिळवा यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करत असतो. किंमत कमी असताना शेअरची खरेदी करतात आणि शेअर्सची (Share) किंमत वाढल्यानंतर विकतात. या खरेदी-विक्रीतून गुंतवणूकदारांना (investors) चांगला नफा मिळतो. एवढंच नाही तर चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्या गुंतवणूकदारांना लाभांश म्हणजेच डिव्हिडंडही देतात. कंपन्या शेअरधारकांना डिव्हिडड देतात कारण गुंतवणूकदार कंपनीच्या व्यवसायातील एक महत्वाचा घटक आहे. कोणत्याही गुंतवणुकीत डिव्हिडंड सारखा फायदा होत नसतो. तसेच सर्वच कंपन्यांना डिव्हिडंड देणं बंधनकारक नाही. मात्र, फायद्यात असणाऱ्या कंपन्या बऱ्याचदा डिव्हिडंड देत असतात. आता याचा फायदा म्युच्युअल फंडात कसा होतो हे समजून घेऊया.परतावा कमी मिळणाऱ्या गुंतवणूकदारांना जोखिमेची भिती वाटते . म्हणून असे गुंतवणूकदार डिव्हिडंट देणाऱ्या फंडात गुंतवणूक करतात. असे गुंतवणूकदार त्यांच्या कमाईतील एक हिस्सा डिव्हिडंटद्वारे कमावत असतात.

डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय ?

डिव्हिडंड यील्ड फंड योजनेतील कमीत कमी 65 टक्के गुंतवणूक डिव्हिडंड यील्ड म्हणजे लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये असावी. बहुतांश गुंतवणूकदार एखादा शेअर्स विकत घेताना किंवा खरेदी करताना कंपनी डिव्हिडंड देतेय की नाही? हे पाहतात. गुंतवणूकदार खातेवही मजबूत असलेली, सतत रोख येत असलेली आणि डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीच्या शोधात असतात.एखाद्या शेअरची बाजारातील किंमत आणि त्यावरील नगदी लाभांशाच्या गुणोत्तराला डिव्हिडंड यिल्ड असे म्हणतात.

नियमीत उत्पन्नासाठी फायदेशीर

समजा एखाद्या शेअरची किंमत 500 रु आहे आणि कंपनीने 10 रुपये प्रती शेअर लाभांश दिला तर त्याचा डिव्हिडंड यील्ड 2 टक्के आहे. तसेच एखाद्या कंपनीच्या एकूण उत्पन्न आणि डिव्हिडंच्या एकूण रक्कमेच्या गुणोत्तराला डिव्हिडंड पेआऊट रेशीओ असे म्हणतात.डिव्हिडंड यील्ड फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणण्यासाठी तसेच बाजारातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी देतो.व्हॅल्यू रिसर्चच्या 7 जुलै 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार डिव्हिडंड यील्ड म्युच्युअल फंड्सनं गेल्या तीन वर्षात 16 टक्के परतावा दिलाय. कमी असलं तरीही नियमित उत्पन्न ज्यांना हवं अशा गुंतवणूकदारांनी डिव्हिडंट यिल्ड फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो.

सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.