FD Investment : FD मध्ये गुंतवणूक करावी का? रेपो रेट वाढीचा मिळेल का दिलासा की होणार नाही मोठा फायदा..

FD Investment : मुदत ठेवीत गुंतवणूक करावी का? तज्ज्ञांचे मत काय?

FD Investment : FD मध्ये गुंतवणूक करावी का? रेपो रेट वाढीचा मिळेल का दिलासा की होणार नाही मोठा फायदा..
मुदत ठेवमध्ये गुंतवणूक करावी का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 8:18 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दोन दिवसांपूर्वी सलग पाचव्यांदा रेपो दरात 35 बीपीएसची वाढ केली. त्यामुळे रेपो दर (Repo Rate)  5.9% टक्क्यांहून थेट 6.25% टक्क्यांवर पोहचला. केंद्रीय बँकेच्या या निर्णयामुळे वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्ज आणि त्याचे हप्ते महागले आहेत. सध्याच्या ग्राहकांच्या खिशावर त्याचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे कर्जदार हवालदिल झाले आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्याचा मुदत ठेवीत (FD) गुंतवणूकदारांना काय फायदा होईल ते पाहुयात..

व्याजदर वाढीचा फटका कर्जदारांना बसणार आहे. तसेच बँकेतील विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना व्याजदर वाढीचा फायदा होणार आहे. येत्या काही दिवसात बँका मुदत ठेव योजनांमधील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेवीदारांना अधिकचा परतावा मिळेल.

तुम्ही पण या संधीचे सोने करु इच्छित आहात का? परंतु, बाजारातील तज्ज्ञांनी घाईत कोणाताही निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. मुदत ठेवीत गुंतवणूकीसाठी काही दिवस वाट पाहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामागची त्यांनी दिलेली कारणं समजून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञांच्या मते व्याजदरातील वाढ ही केवळ रेपो दरावर अवलंबून नाही. क्रेडिट ग्रोथ रेटचा ही ठेवीतील वृद्धीवर परिणाम दिसून येतो. जोपर्यंत क्रेडिट ग्रोथ रेट चांगले प्रदर्शन करेल, तोपर्यंत ठेवीचा वृद्धी दर चांगले प्रदर्शन करेल. वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी बँका आकर्षक व्याजदर ठेवतील.

Paisabazaar चे सह संस्थापक नवीन कुकरेजा यांच्या मते, सध्याच्या ठेवीदारांनी त्यांची गुंतवणूक सुरळीत ठेवण्यास हरकत नाही. सध्याची एफडी तोडून, बंद करुन नवीन एफडी सुरु करणे हितवाह नाही. कारण नवीन एफडीचे व्याजदर आणि जून्या एफडीवर मिळणारे व्याजदरात फार मोठा फरक नसतो. तसा फरक जर पडत असेल तरच याविषयीचा निर्णय घ्यायला हवा.

जर एखाद्याला मुदत ठेवीत गुंतवणूक वाढवायची असेल तर त्याने ती दीर्घकाळासाठी करु नये. शॉर्ट टर्मसाठी, अल्प कालावधीसाठी ही गुंतवणूक करण्याचा सल्ला कुकरेजा यांनी दिला आहे. तसेच ठेवीदारांनी गुंतवणूक करताना ऑटो रिन्यूअल सुविधेपासून वाचावे असा सल्ला ही त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.