EPFO ने 6 कोटी पीएफ खातेधारकांच्या पैशासंदर्भात दिली महत्त्वाची माहिती, त्वरित तपासा

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.

EPFO ने 6 कोटी पीएफ खातेधारकांच्या पैशासंदर्भात दिली महत्त्वाची माहिती, त्वरित तपासा
New income tax rule

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) आपल्या 6 कोटी खातेधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती जारी केली. जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल, तर तुम्हालाही खूप मदत मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधीने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केलाय. ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली.

कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. यामध्ये पैसे जमा केले जातात, तसेच त्या पीएफवर व्याज देखील मिळते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या पीएफ पैशांबाबत खूप सतर्क असणे आवश्यक आहे.

EPFO ने काय सांगितले ते जाणून घ्या

ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, “ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही.”

जर तुम्ही ऐकले नाही तर मोठे नुकसान

ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून नेहमी सतर्क राहा. यासोबतच ईपीएफओने बनावट वेबसाईट टाळण्याचा सल्लाही दिला. जर तुम्ही EPFO ​​च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमची फसवणूक होऊ शकते.

बँका वेळोवेळी अलर्ट देखील जारी करतात

बँक देखील आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी दररोज अलर्ट जारी करते. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत राहते.

बँकिंग फसवणुकीची प्रकरणे सातत्याने वाढतायत

लॉकडाऊनदरम्यान बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. RBI च्या अहवालानुसार, डिजिटल व्यवहारांमुळे वर्ष 2018 19 मध्ये 71,543 कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक झाली. या काळात बँक फसवणुकीची 6800 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. 2017 मध्ये बँक फसवणुकीची 5916 प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी 41,167 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाली. गेल्या 11 आर्थिक वर्षांमध्ये बँक फसवणुकीची एकूण 53,334 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर त्यांच्या माध्यमातून 2.05 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

संबंधित बातम्या

नियम बदलले! पोस्ट ऑफिसच्या NSC, SCSS मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी

IRCTC ची लष्करी जवानांना जबरदस्त ऑफर, विमान तिकिटांवर मिळणार इतकी सूट

Important information provided by EPFO regarding money of 6 crore PF account holders, check immediately

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI