दुसऱ्या तिमाहीत सरकारी मालकीच्या ‘या’ बँकेच्या नफ्यात 154 टक्क्यांनी वाढ, NPA घटला

नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) च्या बाबतीत बँकेने चांगली कामगिरी केली. 30 सप्टेंबर 2021 रोजी एकूण कर्जावरील बँकेचा निव्वळ NPA 2.77 टक्के होता, जा एका वर्षापूर्वी 4.30 टक्के होता. निव्वळ एनपीए 2.77 टक्के आहे, जो आरबीआयच्या विहित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे, अशी माहिती IOB ने एका प्रकाशनात दिलीय.

दुसऱ्या तिमाहीत सरकारी मालकीच्या 'या' बँकेच्या नफ्यात 154 टक्क्यांनी वाढ, NPA घटला
गुंतवणूक

नवी दिल्लीः सरकारी मालकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकेचा (IOB) चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफा दुपटीने वाढून 376 कोटी रुपये झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 148 कोटी रुपये होता. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) मधून बँक IOB ​​देखील पुनरावलोकनाधीन कालावधीत बाहेर आली. बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न 5,376 कोटी रुपये होते, जे मागील वर्षी याच कालावधीत 5,431 कोटी रुपये होते.

एनपीए कमी झाला

नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) च्या बाबतीत बँकेने चांगली कामगिरी केली. 30 सप्टेंबर 2021 रोजी एकूण कर्जावरील बँकेचा निव्वळ NPA 2.77 टक्के होता, जा एका वर्षापूर्वी 4.30 टक्के होता. निव्वळ एनपीए 2.77 टक्के आहे, जो आरबीआयच्या विहित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे, अशी माहिती IOB ने एका प्रकाशनात दिलीय. मूल्याच्या बाबतीत निव्वळ एनपीए 5,291 कोटी रुपयांवरून 3,741 कोटी रुपयांवर घसरला. एकूण NPA 13.04 टक्क्यांवरून (रु. 17,660 कोटी) 10.66 टक्क्यांवर (रु. 15,666 कोटी) घसरला. बँकेची बुडीत कर्जे आणि आकस्मिकतेसाठीची तरतूद या तिमाहीत 1,036.37 कोटींवर गेली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,192.55 कोटी रुपये होती.

समभाग 1.35 टक्क्यांनी वाढून बंद झाले

बाजारातील घसरणीदरम्यान इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर बुधवारी 1.35 टक्क्यांनी वाढून 22.50 रुपयांवर बंद झाला.

PCA फ्रेमवर्कमधून बाहेर काढले

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने इंडियन ओव्हरसीज बँकेला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए फ्रेमवर्क) मधून बाहेर काढले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वित्तीय पर्यवेक्षण मंडळाने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. 31 मार्च 2021 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, बँकेने PCA पॅरामीटरचे उल्लंघन केलेले नाही. अशा परिस्थितीत आता पीसीएच्या चौकटीतून बाहेर काढण्यात आले. पीसीएच्या चौकटीतून बाहेर काढल्यानंतर आता बँक मुक्तपणे कर्ज वितरण आणि व्यवसाय करू शकणार आहे. जर एखादी बँक रिझर्व्ह बँकेच्या पीसीए चौकटीत राहिली, तर तिच्यावर कर्ज वितरण आणि व्यवसाय करण्यासाठी अनेक बंधने घालण्यात आलीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 2015 मध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेवर याची अंमलबजावणी केली.

संबंधित बातम्या

Policy Bazaar IPO : सब्सक्रिप्शनची तारीख, बँडची किंमत अन् बरेच काही एका क्लिकवर

आता Google Pay सह आरोग्य विमा खरेदी करा, SBI ची जनरल इन्शुरन्सबरोबर भागीदारी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI