AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBC Income Tax : याला धाड म्हणू की सर्वेक्षण रे ! सर्वेक्षण आणि शोध यात नेमका फरक काय

BBC Income Tax : सध्या बीबीसीवरील प्राप्तिकर विभागाच्या धाडसत्राने देश ढवळून निघाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या कारवाईकडे साशंक नजरेने पाहण्यात येत आहे. केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मग ही धाड आहे की सर्वेक्षण?

BBC Income Tax : याला धाड म्हणू की सर्वेक्षण रे ! सर्वेक्षण आणि शोध यात नेमका फरक काय
| Updated on: Feb 16, 2023 | 4:51 PM
Share

नवी दिल्ली : प्राप्तिकर खात्याने बीबीसीवर (BBC) कारवाईसाठी अगदी योग्य दिवस निवडला. प्रेमाच्या दिवशी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सूडबुद्धीने कारवाई केली, असा सूर देशातील विरोधक आवळत आहेत. प्राप्तिकर खात्याने 14 फेब्रुवारी रोजी म्हणजे व्हॅलेंटाईन डे रोजी बीबीसीवर धाड घातली. अर्थात या शब्दावरुन बराच खल सुरु आहे. प्राप्तिकर खात्याने धाड हा शब्द योग्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे. आज तिसऱ्या दिवशीही प्राप्तिकर खात्याची टीम बीबीसीच्या कार्यालयात तळ ठोकून आहे. मुंबई आणि दिल्लीच्या कार्यालयांवर एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली आहे. बीबीसी कर चुकवेगिरी करत असल्याचा प्राथमिक आरोप आहे. बीबीसीने (British Broadcasting Corporation) मुद्यामहून ट्रान्सफर प्राइसिंग नियमांचे (Non-compliance with the Transfer Pricing Rules) पालन केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात त्यानंतर आता धाड (Raid), सर्वेक्षण (Surveys) आणि शोध (Search) या शब्दांना चांगलेच वजन प्राप्त झाले, हे वेगळं सांगायला नको.

किंमत हस्तांतरण (Transfer Pricing) ही एक लेखा परिक्षणाची (Accounting) प्रक्रिया आहे. मुख्य कंपनीतील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाच्या मुल्याचे प्रतिनिधित्व यातून अधोरेखित होते. एका कंपनीतील एक विभाग दुसऱ्या विभागाकडून वस्तू अथवा सेवा यासंदर्भातील व्यवहार करणार असेल तर हा प्रक्रिया होते. या दोन विभागात कोणतीही रोखीतील खरेदी-विक्री होत नाही. लेखा विभाग त्याची केवळ नोंद करतो. त्याला प्राप्तिकर खात्याच्या भाषेत ट्रान्सफर प्राइसिंग असे म्हणतात.

पीटीआयनुसार, सर्वेक्षण टीम बीबीसीमधील आर्थिक व्यवहार, कंपनीची रचना आणि इतर सविस्तर माहितीचा शोध घेत आहे. ही टीम इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवरून डेटा कॉपी करुन पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. सर्वेक्षणाचे काम आणखी काही काळ सुरु राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीबीसीवरील या कारवाईत धाड, सर्वेक्षण आणि शोध या शब्दांचा सर्वाधिक वापर होत आहे. त्यात सर्वेक्षण आणि शोध हे शब्द एकमेकांना पूरक म्हणून वापरतात. पण कायद्याच्या चष्म्यानुसार, त्यात तफावत आहे. या दोन्ही संज्ञेत फरक आहे. त्यामुळेच देशात या कारवाईवरुन संभ्रम दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

एखादी संस्था, व्यक्ती यांनी संपत्ती, कमाई, मालमत्ता दडवली, लपवली असेल तर सर्वेक्षण करण्यात येते. या कारवाईचा प्रमुख उद्देश यासंबंधीची माहिती गोळा करणे एवढाच असतो. व्यक्ती, समूह, संस्था त्यांच्या आवक-जावकची, व्यवहारांची माहिती, तपशील योग्यप्रकारे जतन करतो की नाही. त्याची नोंद योग्यरित्या ठेवतो का? याविषयीचा पडताळा सर्वेक्षणात करण्यात येतो. आयकर खात्याच्या नियम 133A अंतर्गत तसेच अर्थ कायदा, 2002 अंतर्गत याविषयीची कार्यवाही करण्यात येते.

कर चुकवेगिरी करण्यासाठी व्यक्ती, समूह अथवा संस्था यांचे कार्यालय, घर, व्यावसायिक प्रतिष्ठान याठिकाणी तपास करण्यात येतो. कमाई आणि संपत्ती किती आहे याची माहिती घेण्यात येते. तसेच अधिकाऱ्यांना संबंधीतांची मालमत्ता, कागदपत्रे, संपत्ती सील करण्याचे अधिकार असतात. अशा कारवाईला शोध आणि सील ऑपेरशन असेही नाव आहे. पण सरळधोडपणे प्राप्तिकर खात्याच्या कारवाईला सर्वच जण धाड असे संबोधतात. पण त्यात फरक असतो. धाडीचा उद्देश आणि कारवाई यामध्येही फरक असतो.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.