AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोळसा उत्पादनात भारताचा नवीन रेकॉर्ड; 42,315.7 कोटींची बचत, पंतप्रधानांनी पाठ थोपटली

India Coal Production : भारताने कोळसा उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे कोळसा उत्पादनात नवीन विक्रम नोंदवतानाच खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला आहे. 42,315.7 कोटींची बचत करण्यात यश आले आहे.

कोळसा उत्पादनात भारताचा नवीन रेकॉर्ड; 42,315.7 कोटींची बचत, पंतप्रधानांनी पाठ थोपटली
कोळसा उत्पादनात नवीन विक्रमImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 22, 2025 | 11:20 AM
Share

भारताने कोळसा उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. चालू आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा विक्रम मोडीत निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ऊर्जा सुरक्षा आणि आत्मनिर्भरता क्षेत्रात हे महत्त्वाचे पाऊल मानण्यात येते आहे. कोळशाचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी तसेच अनेक उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जातो. कोळसा हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी मुख्य ऊर्जा स्रोत आहे. देशाने गेल्यावर्षात 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) मध्ये 99.783 कोटी टन कोळसा उत्पादन केले होते.

असा रचला इतिहास

कोळसा उत्पादनात भारताने नवीन टप्पा गाठला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात या 20 मार्च रोजी देशाने एक अब्ज टन (BT) उत्पादनाचा टप्पा पार केला. ही मोठी उपलब्धी मानण्यात येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात 997.83 दशलक्ष टन (MT) कोळसा उत्पादन झाले होते. विशेष म्हणजे उत्पादनाचा हा रेकॉर्ड गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 दिवस आधी मिळाली आहे.

5 लाख खाण कामगारांना सलाम

कोळसा क्षेत्रात देशाने हा टप्पा सहज गाठला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपन्या, 350 हून अधिक कोळसा खाणींमध्ये कार्यरत 5 लाख खाण कामगारांनी हा सुवर्णक्षण खेचून आणलाच नाही तर साजरा करण्याची संधी सुद्धा दिली आहे. देशाच्या एकूण ऊर्जेत जवळपास 55% स्त्रोत हा कोळशावर अवलंबून आहे. देशातील सुमारे 74% वीज उत्पादन कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्पांवर अवलंबून आहे.

परकीय चलनाची झाली बचत

प्राप्त आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत भारताच्या कोळसा आयातीत 8.4% घट आली आहे. यामुळे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 5.43 अब्ज डॉलर्स म्हणजे 42,315.7 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोपटली पाठ

कोळसा उत्पादनातील या नवीन विक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्रातील सर्वांचीच पाठ थोपटली. त्यांना एक्सवर त्यांच्या भावना मांडल्या. “चालू आर्थिक वर्षात एक अब्ज टन कोळसा उत्पादन हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा पार करणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. ऊर्जा सुरक्षा, आर्थिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेबद्दल आपल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया करताना पंतप्रधानांनी, ही कामगिरी कोळसा क्षेत्रातील सर्व संबंधित व्यक्तींच्या मेहनती आणि समर्पणाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.

रेड्डी यांनी केली घोषणा

उत्पादनातील ही भरारी देशाच्या वाढत्या वीज मागणीची पूर्तता करेल, आर्थिक वृद्धीला गती देईल आणि प्रत्येक भारतीयासाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करेल, असा विश्वास केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी व्यक्त केला. कोळसा मंत्रालयाने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी कोळसा उत्पादन लक्ष्य 108 कोटी टन निश्चित केले आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...