AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी-अंबानी नव्हे, हा व्यक्ती करतो सर्वात जास्त दान, वाचा भारतातील दानशूर लोकांची यादी

India Top 10 Philanthropists: भारतातील सर्वात दानशूर लोकांची यादी समोर आली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आहेत, मात्र दान करण्याच्या बाबतीत या दोघांच्याही पुढे एक व्यक्ती आहे.

अदानी-अंबानी नव्हे, हा व्यक्ती करतो सर्वात जास्त दान, वाचा भारतातील दानशूर लोकांची यादी
Ambani and Adani
| Updated on: Nov 06, 2025 | 5:07 PM
Share

भारतीय संस्कृतीत दान करणे हे शुभ मानले जाते. आपल्यापैकी अनेकजण आपल्या ऐपतीप्रमाणे दान करत असतात. अशातच आता भारतातील सर्वात दानशूर लोकांची यादी समोर आली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आहेत, मात्र दान करण्याच्या बाबतीत या दोघांच्याही पुढे एक व्यक्ती आहे. भारतातील आघाडीच्या श्रीमंत लोकांनी 2025 मध्ये आतापर्यंत 10380 कोटी रूपयांचे दान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिव नाडर

भारतातील सर्वात दानशूर लोकांच्या यादीत एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब आघाडीवर आहे. नाडर कुटुंबाने 2025 मध्ये एकूण 2708 कोटी रुपयांचे दान दिले आहे. ते गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती बनले आहेत. ते दररोज सरासरी 7.4 कोटी रुपयांचे दान देतात. शिव नाडर यांची देणगी रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढली आहे.

टॉप 10 दानशूर व्यक्ती

1. शिव नाडर आणि कुटुंब (एचसीएल टेक्नॉलॉजीज) दान केलेली रक्कम- 2708 कोटी रूपये. ही देणगी शिव नाडर फाउंडेशनद्वारे शिक्षण आणि कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी देण्यात आली आहे.

2. मुकेश अंबानी आणि कुटुंब (रिलायन्स फाउंडेशन) दान केलेली रक्कम – 626 कोटी शिक्षण, ग्रामीण परिवर्तन, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि वारसा संवर्धनासाठी दान

3. बजाज कुटुंब (जमनालाल कनिराम बजाज ट्रस्ट, कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन) दान केलेली रक्कम – 446 कोटी ग्रामीण भारतातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी रक्कम दान

4. कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब (आदित्य बिर्ला ग्रुप) दान केलेली रक्कम – 440 कोटी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि क्रीडा क्षेत्रासाठी दान

5. गौतम अदानी आणि कुटुंब (अदानी फाउंडेशन) दान केलेली रक्कम -386 कोटी शिक्षण, कौशल्य विकास, सामुदायिक आरोग्य कार्यक्रमासाठी दान

6. नंदन नीलेकाणी दान केलेली रक्कम -365 कोटी सार्वजनिक सेवांमध्ये नवोपक्रम आणि सामाजिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी दान

7. हिंदुजा कुटुंब (हिंदुजा फाउंडेशन) दान केलेली रक्कम – 298 कोटी आरोग्य, शिक्षणासाठी दान

8. रोहिणी नीलेकणी (एकस्टेप फाउंडेशन) दान केलेली रक्कम – ₹204 कोटी शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी दान

9. सुधीर आणि समीर मेहता (UNM फाउंडेशन) दान केलेली रक्कम -189 कोटी आरोग्य, ग्रामीण विकास आणि शिक्षणासाठी दान

10. सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला (विल्लू पूनावाला फाउंडेशन) दान केलेली रक्कम – 173 कोटी शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी दान

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.