स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करायची? जाणून घ्या SBI आणि PNB ची नवी योजना

तुम्हाला स्वस्त आणि वादग्रस्त नसलेली प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, तर चांगला पर्याय आहे. (Indian Banks Auctions Mortgaged Properties)

स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करायची? जाणून घ्या SBI आणि PNB ची नवी योजना

मुंबई : जर तुम्ही येत्या वर्षात घर, फ्लॅट, व्यावसायिक किंवा औद्योगिक प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही योग्य वेळ आहे. कारण पंजाब नॅशनल बँक 29 डिसेंबरला जप्त केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वस्त आणि वादग्रस्त नसलेली प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, तर हा अतिशय चांगला पर्याय आहे. (Indian Banks Auctions Mortgaged Properties)

कोणत्या प्रॉपर्टीचा लिलाव?

जी प्रॉपर्टी डिफॉल्ट लिस्टमध्ये असते, त्याच प्रॉपर्टीचा बँक लिलाव करते. अनेक लोक घरी खरेदी करताना होम लोन किंवा इतर प्रकारचे कर्ज घेतात. मात्र ज्यावेळेस एखाद्या कर्जदाराला बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही, त्यावेळी बँक ती प्रॉपर्टी जप्त करते. त्यानंतर वेळोवेळी ही प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावातून बँक आपली थकबाकी गोळा करते.

पंजाब नॅशनल बँक येत्या 29 डिसेंबरला लिलाव करणार आहे. यात 3 हजार 681 निवासी, 961 व्यावसायिक, 527 औद्योगिक आणि 7 कृषी मालमत्तांचा समावेश आहे.

या दरम्यान लिलाव होणारी प्रॉपर्टी जर तुम्ही खरेदी केलात तर ती तुम्हाला योग्य त्याच भावात मिळेल. लिलाव होणाऱ्या प्रॉपर्टीची माहिती मिळण्यासाठी तुम्हाला IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) च्या https://ibapi.in/ या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

या सोबतच तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या कोणत्याही शाखेत याची माहिती मिळू शकते. यात तुम्हाला प्रॉपर्टी फ्री होल्ड किंवा लीज होल्ड आहे? ती नेमकी कोणत्या जागेवर आहे? त्याचा एरिया किती आहे? याची सर्व माहिती मिळू शकते.

SBI द्वारे ई-निलामी

पंजाब नॅशनल बँकेसह भारतीय स्टेट बँकेनेही प्रॉपर्टी लिलावाची घोषणा केली आहे. हा लिलावही येत्या 30 डिसेंबरला होणार आहे. यावेळी SBI द्वारे ई-निलामी केली जाईल. त्यामुळे तुम्हाला जर चांगल्या किंमतीत घर खरेदी करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही हा पर्यायाचा नक्की विचार करु शकता. (Indian Banks Auctions Mortgaged Properties)

संबंधित बातम्या : 

दैनंदिन जीवनाशी निगडीत ‘हे’ महत्त्वाचे नियम 2021मध्ये बदलणार, जाणून घ्या काय होणार…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI