AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Boom: ट्रम्पकडून ती आनंदवार्ता…शेअर बाजाराचा भांगडा, युद्धाची भीती छुमंतर, घडलं तरी काय?

Stock Market Rally: अमेरिकेतून ती आनंदवार्ता धडकताच शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली. आखाती देशातील युद्धाची धग कायम असतानाही शेअर बाजाराने भांगडा केला. युद्धाची भीती छुमंतर झाल्याचे सकाळच्या सत्रात दिसत आहे.

Share Market Boom: ट्रम्पकडून ती आनंदवार्ता...शेअर बाजाराचा भांगडा, युद्धाची भीती छुमंतर, घडलं तरी काय?
भारत अमेरिका व्यापारी करारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 10:57 AM
Share

India-US Trade Deal: मंगळवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे मंगलच मंगल झाले. बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी रॉकेटसारखा उडाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्सने 500 अंकाहून अधिक उसळी आली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE Nifty ने तेजीचा घोडा दौडवला. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 96.86 अंक वा 0.12 टक्क्यांच्या तेजीसह उघडला होता. पहिल्या सत्रात सेन्सेक्सने 78,617.16 अंकाची सुरुवात केली. एनएसई निफ्टी 50 ने दिवसाची सुरुवात चांगली झाली. आज निफ्टी 50 हा 9.70 अंक वा 0.04 टक्क्यांच्या उसळीसह 24,374.55 च्या स्तरावर उघडला.

आज सकाळी बाजार उघडताच सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 430 अंकांच्या तेजीसह 78,950 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टी 50 हा 117 अंकांच्या उसळीसह 24,480 च्या स्तरावर ट्रेड करत होता. भारत आणि अमेरिका व्यापार कराराविषयी मोठी अपडेट समोर आल्यानंतर आखाती युद्धाची भीती झटक्यात बाजूला झाली आणि गुंतवणूकदारांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. शेअर बाजार सुखावला.

बीएसईचे टॉप गेनर आणि लूजर

बीएसई बास्केटमध्ये अदानी पोर्ट, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, बजाज फायनान्स हे टॉप गेनर ठरले. तर त्याचवेळी टेक महिंद्रा, टिसीएस आणि आयएनएफवाय यांना बाजारात मांड ठोकता आली नाही. या कंपन्यांना पहिल्या सत्रातच सूर गवसला नाही. आता दुपारनंतर बाजारात काय बदल होतो हे समोर येईल.

सोमवारी बाजाराची दिशा काय होती?

भारतीय शेअर मार्केटमध्ये सोमवारी, 20 एप्रिल रोजी व्यापारी दिवसाची सुरुवातही तेजीने झाली होती. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 हिरव्या रंगात न्हाऊन निघाले. सेन्सेक्स 26.76 अंक वा 0.03 टक्क्यांच्या तेजीसह 78,520.30 अंक तर एनएसई निफ्टी 50 हा निर्देशांक 11.30 अंक वा 0.05 टक्क्यांनी उसळून 24,364.85 च्या स्तरावर पोहचला.

India US Trade Deal

अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेत व्यापारी कराराचा नवीन अध्याय लवकरच लिहिल्या जाऊ शकतो. 20 एप्रिलपासूनच याविषयीच्या चर्चा समोर येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. अमेरिकेने न्यायालयाने टॅरिफ हे बेकायदेशीर म्हटले होते. टॅरिफ रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान दर्पण जैन यांच्या नेतृत्वात एक डझन भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अमेरिकन दौऱ्यावर असल्याचे आणि ते अनेक विषयावर चर्चा करणार असल्याचे समोर येत आहे.

Follow Us
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा