AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर बाजारात त्सुनामी… 19 लाख कोटी बुडाले, 5 कारणांमुळे हाहा:कार; तिसऱ्या कारणाचा सर्वाधिक फटका

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे, सेन्सेक्स 4000 आणि निफ्टी 5000 पेक्षा जास्त कोसळले आहेत. ट्रम्पच्या टॅरिफ, जागतिक आर्थिक मंदीची भीती आणि FII ची विक्री ही प्रमुख कारणे आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सवर मोठा परिणाम झाला आहे.

शेअर बाजारात त्सुनामी... 19 लाख कोटी बुडाले, 5 कारणांमुळे हाहा:कार; तिसऱ्या कारणाचा सर्वाधिक फटका
Stock Market Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2025 | 1:07 PM
Share

भारतीय शेअर मार्केटमध्ये पुन्हा मोठा महाभूकंप आला आहे. या भूकंपामुळे गुंतवणूकदारांची झोपच उडाली आहे. जगभरात सुरू असलेल्या ट्रेड वॉरची भीती आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात हाहा:कार उडाला आहे. भारतीय शेअर बाजारातील दिवसाची सुरुवातच सेन्सेक्स 4000 अंकाने कोसळून झाली तर निफ्टी 50 21,750 अंकाच्या खाली गेला. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये 10 टक्क्याची घसरण झाली आहे. इंडिया VIX 52 टक्क्यावर जाऊन 21 टक्क्यावर आला आहे. बाजारातील पडझडीचे मुख्य पाच कारणे आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा.

जागतिक बाजारपेठेतील विक्री

अमेरिका, आशिया आणि यूरोपच्या बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जापानमध्ये शेअर बाजार 9 टक्क्यांनी कोसळला आहे. तैवानचा बाजार 10 टक्क्याने कोसळला आहे. या शिवाय अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी मोटी विक्री झाली. Dow Jones 5.5 टक्के कोसळला, S&P 500 मध्ये 5.97 टक्के घसरण होती. तर, Nasdaq 5.73 टक्के कोसळताना दिसला. त्यामुळे बाजाराचा नूरच बदलला आणि विक्री दिसून आली.

टॅरिफचा परिणाम

ट्रम्प प्रशासनाने 180 हून अधिक देशांवर एकाचवेळी टॅरिफ लागू केले. त्याचा परिणामही बाजारावर दिसून आला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदार धस्तावले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अजून मोठी घसरण पाहायला मिळू शकते.

आर्थिक विकासदराबाबतची चिंता

ट्रम्पच्या टॅरिफमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. कंपन्यांची कमाई घटू शकते आणि लोक खर्च करण्यासाठी धस्तावतील. त्याचा परिणाम विकासावर होणार आहे. चीनने अमेरिकेच्या उत्पादनावर 34 टक्के एक्स्ट्रा टॅक्स लावला आहे. तसेच जेपी मॉरगनने ग्लोबल रिशेसनची शक्यता 40 टक्क्याने वाढवून 60 टक्के केली आहे.

FIIsची तात्काळ विक्री

मार्चमध्ये परदेशी गुंतवणूकदार (FIIs) ने भारतीय बाजारात पुनरागमन केलं होतं. पण एप्रिलमध्ये पुन्हा ते विक्री करत आहेत. केवळ एप्रिलमध्येच आतापर्यंत 13,730 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. जर भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करार झाला नाही तर FIIs आऊटफ्लो अधिक वेगाने होऊ शकतो.

आरबीआयच्या मुद्रा नीतीकडे लक्ष

9 एप्रिल रोजी आरबीआयची एमपीसी बैठक आहे. सध्याची परिस्थिती पाहून रिझर्व्ह बँक व्याज दरात कपात करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या आठवड्यापासून मार्च तिमाही (Q4) चे निकाल येणं सुरू होईल. त्याचेही परिणाम बाजारावर होणार आहेत.

मार्केट दीड वर्षात रुळावर?

दरम्यान, शेअर बाजारातील पडझडीवर अर्थतज्ज्ञ विशाखा बाग यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला आहे. ट्रम्प टॅरिफ हे मार्केट पडण्याचं मुख्य कारण आहे. जागतिक बाजार पेठेतील टॅक्सेशनचा हा परिणाम आहे. मार्केटची ही सेंटिमेंटल प्रतिक्रिया आहे. इम्पोर्ट ड्युटी भारतावर लावल्यामुळे देखील त्याचे परिणाम मार्केटवर झाले आहेत. इतर देशांतून कमीत कमी इम्पोर्ट व्हावे यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. हे व्हर्चुअल खाली पडलेले मार्केट आहे. जसे 2008 नंतर, कोरोना नंतर मार्केटवर आले तसे हे मार्केट देखीलवर येईल. येत्या एक ते दीड वर्षात मार्केट पुन्हावर येईल. एसआयपी सुरूच ठेवली पाहिजे. तसेच मोठ्या कंपन्यांचे स्टॉक घेऊन ठेवायला हवेत. सोन्याचे भाव आणि स्टॉक मार्केट देखील येत्या दिवसात वाढणार आहे, असं विशाखा बाग यांनी म्हटलं आहे.

डिस्क्लेमर : ( टीव्ही 9 मराठी कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. इथे केवळ स्टॉक्सची माहिती दिली जात आहे. कोणतीही गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.