Insurance | मोठी बातमी! आयुर्वेदिक, होमिओपॅथीक उपचारांसाठी पण मिळणार विमा

Insurance | आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विमा नियामक प्राधिकरणाने (IRDAI) सर्व विमा कंपन्यांना त्यांच्या पॉलिसीत आयुष्य उपचार सहभागी करण्यास सांगितले आहे. यामध्ये होमिओपॅथी, योगा आणि आयुर्वेद यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

Insurance | मोठी बातमी! आयुर्वेदिक, होमिओपॅथीक उपचारांसाठी पण मिळणार विमा
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 11:42 AM

नवी दिल्ली | 2 February 2024 : विमा क्षेत्रात बदलाची नांदी येणार आहे. विमा नियामक प्राधिकरणाने (IRDAI) सर्व विमा कंपन्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. त्यानुसार, आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी या सर्व उपचार पद्धतींसाठी विमा पॉलिसी सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे विमा पॉलिसीची लोकप्रियता वाढेल आणि जास्तीत जास्त लोकांना या उपचार पद्धतीचा फायदा होईल.

आयुष उपचार पद्धतीचा समावेश

इरडाने सर्व विमा कंपन्यांना त्यांच्या पॉलिसीमध्ये आयुष उपचाराचा समावेश करण्याची सूचना केली आहे. त्याविषयीची विचारणा केली आहे. त्यासाठी विमा कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळाकडून मंजूरी घेण्याची सूचना पण करण्यात आली आहे. याविषयीची मार्गदर्शक सूचना पण सादर करण्यास सांगण्यात आले आहे. विमा नियामक प्राधिकरणाने सर्व विमा कंपन्यांना 1 एप्रिल, 2024 पर्यंत मार्गदर्शक सूचना तयार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात त्या लागू करता येतील.

हे सुद्धा वाचा

कंपन्यांना दिल्या या सूचना

विमा नियामक प्राधिकरणाने याविषयीच्या सूचना दिल्या आहेत. मार्गदर्शक सूचनांमध्ये कंपन्यांना गुणवत्ता आणि दर्जावर जोर देण्यास सांगितले आहे. तसेच या सर्व उपचार पद्धतींचा वापर करणाऱ्या रुग्णालयात कॅशलेस व्यवस्था करण्यास सांगितले आहे. गेल्या काही वर्षात आयुष उपचार लोकप्रिय होत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना आयुष्य उपचार करण्यासाठी पॉलिसी आणण्यास सांगितले आहे.

हायकोर्टाच्या निर्देशात बदल

विमा नियामक प्राधिकरणाने याविषयीचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आयुष मंत्रालय आणि इतर नियुक्त तज्ज्ञांआधारे मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी पॉलिसीत बदल करण्यास सांगितले आहे. डिसेंबर, 2023 मध्ये मद्रास हायकोर्टाने इरडाला याविषयीचा आदेश दिला होता. विमा कंपन्यांनी आपल्या पॉलिसीत आयुष उपचार करण्याचे आणि रुग्णांना खर्च परत करण्याचा आदेश निकालात देण्यात आला होता.

कॅशलेस उपचारासाठी बोलणी सुरु

जनरल इन्शुरन्स काऊन्सिल ही देशातील सर्व विमा कंपन्यासोबत याविषयी चर्चा करत आहे. त्यानुसार, प्रत्येक आरोग्य विमाधारकाला कॅशलेस उपचार सुविधाचा फायदा देणे हा आहे. विमा कंपनीच्या यादीत संबंधित रुग्णालय नसले तरी विमाधारकाला विनारोख उपचार देण्यासंबंधी सहमती तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व विमा कंपन्यांशी युद्धपातळीवर चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.