AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंतवणुकीच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा घेतात जास्त जोखीम , FD नाही इथं करतात गुंतवणूक

एका सर्वेक्षणानुसार, 18 ते 25 वर्षांच्या महिला गुंतवणूकदारांना फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) सारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा उच्च जोखमीच्या पर्यायात गुंतवणूक करण्याची शक्यता तीन पटीने अधिक आहे.

गुंतवणुकीच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा घेतात जास्त जोखीम , FD नाही इथं करतात गुंतवणूक
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना काय आहे? - बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आहेत. ही भविष्यकाळातील सुरक्षित योजना असून पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे.
| Edited By: | Updated on: Mar 08, 2021 | 7:50 AM
Share

नवी दिल्ली : तरुण महिला गुंतवणूकदारांना जास्त जोखीम आणि उच्च परतावा असलेल्या मालमत्ता जसं की स्टॉक इत्यादीमध्ये गुंतवणूक करणे आवडते. एका सर्वेक्षणानुसार, 18 ते 25 वर्षांच्या महिला गुंतवणूकदारांना फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) सारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा उच्च जोखमीच्या पर्यायात गुंतवणूक करण्याची शक्यता तीन पटीने अधिक आहे. ग्रोव यांनी हे सर्वेक्षण केले. यामध्ये 28,000 लोकांकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. या सर्वेक्षणात महिलांच्या गुंतवणकीच्या लक्ष्याचादेखील उल्लेख आहे. (International Women day 2021 in investing womens take more risk than men)

सर्वेक्षणानुसार 57 टक्के तरुण स्त्रिया वैयक्तिक कारणासाठी गुंतवणूक करतात. तर 28 टक्के लोक त्यांच्या प्रवासासाठी आणि 28 टक्के उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करतात. वार्षिक 30 लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकर निवृत्ती घेतल्यामुळेच हे गुंतवणूक करतात. दहा ते 26 लाख रुपये मिळवणाऱ्या 36 टक्के महिला आणि वर्षाकाठी 5 ते १० लाख रुपये मिळवणाऱ्या 26 टक्के महिलांनीही याबद्दल माहिती दिली आहे. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 64 टक्के स्त्रियांनी लग्न आणि मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक केली आहे.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणं महिलांसाठी सर्वाधिक पसंतीचा पर्याय

सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा महिलांसाठी सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. सर्व वेतनश्रेणीतील महिला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

सोन्यातही गुंतवणूक

महिला सोन्यातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. सर्वेक्षण केलेल्या 25 टक्के महिलांचे म्हणणे आहे की, त्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे. वर्षाकाठी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमविणार्‍या 40 टक्के महिलांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्येही पैसे गुंतवा

वार्षिक 30 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवणार्‍या 6 टक्के महिलांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. तर वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या फक्त 4 टक्के महिलांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. (International Women day 2021 in investing womens take more risk than men)

संबंधित बातम्या – 

इंटरनेटवरून शिका फक्त 5 गोष्टी; मग बघा कसे कमवाल पैसे

एक कप चहापेक्षा कमी किमतीत मिळवा 60000 रुपये; जितक्या लवकर गुंतवणूक, तितकाचा मोठा फायदा

Gold Rate Today: 8 महिन्यांत सोने-चांदी 13,000 रुपयांनी स्वस्त; झटपट वाचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव; वाचा सविस्तर

(International Women day 2021 in investing womens take more risk than men)

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.