NPS : दर महिन्याला गुंतवा 10 हजार रुपये, आयुष्याच्या संध्याकाळी मिळवा पगारापेक्षा जास्त पेन्शन

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 06, 2023 | 12:03 AM

NPS : भविष्यातील सुखी जीवनासाठी आताच या योजनेत गुंतवणूक करा.

NPS : दर महिन्याला गुंतवा 10 हजार रुपये, आयुष्याच्या संध्याकाळी मिळवा पगारापेक्षा जास्त पेन्शन
भविष्यासाठी तरतूद

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात (Private Sector) काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला भविष्याची चिंता नेहमी सतावते. नोकरी सुरु आहे, तोपर्यंत त्यांची धावपळ सुरु असते. त्यांच्या हाती पैसा खेळतो. पण उतारवयात त्यांचे हातपाय चालत नाही आणि औषधांचा खर्च वाढतो. त्यामुळे भविष्यातील खर्च आणि औषधांचा खर्च पेलण्यासाठी अगोदरच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली (National Pension System) ही सरकारी योजना मोठी मदत करेल. एनपीएस (NPS) योजना त्यासाठी महत्वाची ठरते.

सेवानिवृत्तीसाठी आर्थिक तरतूद करणाऱ्यांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरु शकते. अनेक पर्यांयापैकी उतारवयासाठी हा पर्याय उपयोगी ठरु शकतो. काही सरकारी योजना त्यासाठी मदतीला येऊ शकतात.

उतारवयात चांगला परतावा हवा असेल तर तरुणपणीच म्हतारपणाची तरतूद करुन ठेवा. जर तुम्हाला 75,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन हवी असेल तर त्यासाठी फार पूर्वीपासून योजना आखावी लागते. एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. बचतीची ही सवय भविष्यात उपयोगी ठरते.

हे सुद्धा वाचा

दर महिन्याला 75,000 रुपये पेन्शन मिळवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. तरच सेवानिवृत्त व्यक्तीचा खर्च सहज भागविता येऊ शकतो. एनपीएसमध्ये इक्विटी, कॉरपोरेट, डेट, गव्हर्नेस बाँड आणि पर्यायी गुंतवणूक फंड असतो.

गुंतवणूकदाराकडे अॅक्टिव आणि ऑटो, असे दोन पर्याय असतात. यामध्ये इक्विटीमध्ये कमी जोखीम असते. तर पीपीएफ (PPF) आणि मुदत ठेवीतून(FD) जास्त परतावा मिळतो. मॅच्युरिटीनंतरही सर्व रक्कम काढता येत नाही. फंडातील 40 टक्के रक्कम भारतीय आयुर्विमा महामंडळात गुंतवावी लागते.

तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी दर महिना 75,000 रुपये हवे असतील तर तशीच तगडी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिन्याला 75,000 रुपयांची पेन्शन मिळविण्यासाठी व्यक्तिला जवळपास या फंडमध्ये 3.8 कोटी रुपयांची आवश्यकता असेल.

जर एखाद्या तरुणाने 25 व्या वर्षी एनपीएसमध्ये दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर वयाच्या 60 वर्षी, मॅच्युरिटी नंतर ही रक्कम 3,82,80,000 रुपये होईल. 40 टक्के रक्कम एलआयसीकडे जाईल. म्हणजे दर महिन्याला 76,566 रुपये पेन्शन मिळेल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI