Income Tax : इनकम टॅक्स वाचवायचा आहे, मग हा उपाय आहे ना..परताव्यासह कर सवलतही

Income Tax : प्राप्तिकर वाचवायचा असेल तर अनेक सरकारी योजना तुम्हाला मदत करु शकतात. बचतीसोबत तुम्हाला कर ही वाचवता येईल..

Income Tax : इनकम टॅक्स वाचवायचा आहे, मग हा उपाय आहे ना..परताव्यासह कर सवलतही
कर बचतहीसह परतावा Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 4:11 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला कर भरावा (Tax Payer) लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. वेतनात (Payment) वाढ होते, तसा करही (Tax) वाढतो. कर वाचवण्यासाठी तुम्हाला अनेक जण सल्ले देतील. पण योग्य सल्लाच तुम्हाला फायदेशीर ठरतो.  गुंतवणुकीतून (Investment) फायद्यासह कर बचत झाल्यास ही गुंतवणूक तुमच्यासाठी ‘बोनस’ ठरेल.

तुम्हाला सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास असा बोनस मिळू शकतो. तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा (Good Returns) तर मिळेलच पण कर ही भरावा लागणार नाही. या सरकारी योजनांमध्ये (Government Scheme) गुंतवणूक (Investment) केल्यास तुम्ही सहज कर बचत करू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, पब्लिक प्रोव्हिडंट फंडात (PPF) गुंतवणूक केल्यास कर बचत होऊ शकते. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेतंर्गत तुम्हाला 7.1% टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. आयकर नियम 80C अंतर्गत योजनेत कर सवलत देण्यात येते.

हे सुद्धा वाचा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातंर्गत (EPF) तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या योजनेत 8.1% पर्यंत व्याज दर मिळेल. या योजनेत आयकर नियम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळेल. त्यामुळे तुम्ही सहज कर बचत करु शकाल.

बँकांच्या कर बचत मुदत ठेव योजनांमधील गुंतवणूकही फायदेशीर ठरते. गुंतवणूकदारांना या योजनेतंर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर बचतीचा लाभ घेता येतो. गुंतवणुकीपूर्वी या योजनेचा कालावधी केवळ 5 वर्षे असतो हे लक्ष्यात असू द्या.

राष्ट्रीय निवृत्ती योजनेत (NPS) गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर नियम 80CCE अनुसार कर सवलत मिळते. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर सवलतीसोबतच निवृत्तीकाळातही फायदा मिळतो. त्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतात.

ELSS म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करुन तुम्हाला चांगला परतावा मिळवता येतो. कर सवलत मिळते. या योजनेतंर्गत गुंतवणूकदाराला आयकर नियम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. या योजनेचा लॉक-इन पिरियड 3 वर्षे इतका आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.