AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Filing : या करदात्यांना मोठा दिलासा; आयटीआर फाईल करण्याच्या मुदतीत वाढ, नवीन तारीख जाणून घ्या

ITR Filing Date Extended : आयकर खात्याने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटसह इतर व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आता आयटीआर फाईल करण्यासाठी या करदात्यांना मुदत वाढवण्यात आली आहे.

ITR Filing : या करदात्यांना मोठा दिलासा; आयटीआर फाईल करण्याच्या मुदतीत वाढ, नवीन तारीख जाणून घ्या
आयटीआर
| Updated on: Oct 30, 2025 | 8:48 AM
Share

आयकर खात्याने 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी करदात्यांना कर भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उद्योग जगताची मागणी आणि सध्या अनेक राज्यात सुरु असलेल्या नैसर्गिक संकटांची मालिका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी आयकर खात्याने 25 सप्टेंबर रोजी ऑडिट रिपोर्ट दाखल करण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्यात आली होती. 31 ऑक्टोबरपर्यं ही मुदत वाढवण्यात आली होती.

आयकर खात्याने बुधवारी 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी कंपन्या आणि ऑडिट करण्याची गरज असलेल्या करदात्यांना दिलासा दिला. विभागाने या करदात्यांसाठी आयकर रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवली. करदाते आता 10 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. साधारणपणे करदात्यांसाठी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर ही असते.

आयकर विभागाने दिला दिलासा

आयकर विभागाने प्रशासकीय शिखर परिषद, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, निर्धारण वर्ष 2025-26 साठी इनकम टॅक्स दाखल करण्याची यापूर्वीची तारीख 31 ऑक्टोबर होती. ती आता 10 डिसेंबर, 2025 ही करण्यात आली. या करदात्यांना ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. आयकर अधिनियमानुसार, ऑडिटची गरज असणाऱ्या कंपन्या, फर्म, प्रोपाइटरशिप युनिट्सला 31 ऑक्टोबरपर्यंत रिटर्न दाखल करावा लागतो. वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंबसाठी ही मर्यादा 31 जुलै असते.

का वाढवली मुदत

आयकर खात्याने ही मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी उद्योग जगतातून मोठी आग्रही मागणी होत होती. तर अनेक राज्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. त्यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी विभागाने 25 सप्टेंबरपर्यंत ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची मुदत होती. ती एक महिन्यांनी वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे. आता ती वाढवून 10 नोव्हेंबर करण्यात आली आहे. तर निर्धारण वर्ष 2025-26 साठी वैयक्तिक करदात्यांना आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत यंदा 31 जुलैहून 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. या दरम्यान 7.54 कोटींहून अधिक रिटर्न दाखल करण्यात आले. यामध्ये 1.28 कोटी करदात्यांनी स्वतः मूल्यांकन कराचा भरणा केला.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.