ITR With Penalty | आता, केवळ 1000 रुपयांच्या दंडावर जमा करा प्राप्तिकर रिटर्न, हे आहेत नियम

ITR With Penalty | 2022-23 या मूल्यांकन वर्षाकरीता 5 कोटी 88 हजार 962 करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्न जमा केला आहे. 31 जुलै या अंतिम तारखेला रात्री 11 वाजेपर्यंत 67,97,067 रिर्टन फाईल करण्यात आले.

ITR With Penalty | आता, केवळ 1000 रुपयांच्या दंडावर जमा करा प्राप्तिकर रिटर्न, हे आहेत नियम
आता करासहित भरा आयटीआरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 6:40 PM

ITR With Penalty | प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत आता तुमच्या हातून निघून गेली असली तरी पुढील कारवाई टाळण्यासाठी आणखी एक पर्याय तुमच्यासमोर आहे. हा पर्याय म्हणजे दंडाची (Penalty) रक्कम भरणे हा आहे. दंडाची रक्कम भरुन तुम्ही या महिन्यात प्राप्तिकर रिटर्न भरु शकता. त्यानंतर पुढील कारवाई टाळता येईल. पुढील कारवाई त्यापेक्षा ही अवघड असल्याने आणि दंडाची रक्कम, त्यावरील व्याज (Interest) असा हा ताप वाढत जातो. त्यापेक्षा आताच दंडाची रक्कम भरून तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरु शकता. सध्या 1000 रुपये दंड भरुन तुम्हाला आयटीआर (ITR)दाखल करता येतो. 2022-23 या मूल्यांकन वर्षाकरीता (Assessment Year) 5 कोटी 88 हजार 962 करदात्यांनी प्राप्तिकर रिटर्न जमा केला आहे. 31 जुलै या अंतिम तारखेला रात्री 11 वाजेपर्यंत 67,97,067 रिर्टन फाईल करण्यात आले.

31 डिसेंबरपर्यंत भरता येईल आयटीआर

प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता तुम्हाला दंडाच्या रक्कमेसहित आयटीआर (ITR) भरता येईल. आयकर विभागाच्या नियमानुसार 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्यास दंडाची रक्कम 1 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास दंडाची रक्कम 5 हजार रुपये असेल. अंतिम तारखेनंतर 31 डिसेंबर 2022 पूर्वी रिटर्न भरले नाही तर दंड दुप्पट भरावा लागेल. म्हणजेच 5 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपये करदात्यांना दंड भरावा लागेल.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी 1 हजार रुपयांचा दंड

आयकर कायद्याच्या कलम 234 F नुसार रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आयटीआर भरल्यावर दंड म्हणून 5 हजार रुपये भरावे लागतील. मात्र, त्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नसल्यास केवळ 1,000 रुपये दंड आकारून हे काम पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न त्याने निवडलेल्या करप्रणालीअंतर्गत त्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर आयटीआर भरताना त्याला दंडातून सूट देण्यात येईल.

ITR होणार व्हेरिफाईड

आतापर्यंत दाखल झालेल्या आयटीआरपैकी 3 कोटीहून अधिक आयटीआर आयकर रिटर्न म्हणून व्हेरिफाय करण्यात येतील. परतावा विना व्यत्यय त्वरीत मिळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात येते. तुमचा मोबाइल क्रमांक आणि पॅन क्रमांक आधारशी लिंक असेल तर आधार आधारित वन टाइम पासवर्ड (OTP) वापरून हे काम पूर्ण करता येईल.

आयटीआर फाइलिंग जास्त

कर निर्धारण वर्ष 2022-23 साठी आतापर्यंत 5 कोटी 82 लाख 88 हजार 962 जणांनी आयकर विवरणपत्र भरले आहे. आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डलवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै रोजी एका दिवसात रात्री 11 वाजेपर्यंत 67,97,067 आयटीआर दाखल करण्यात आले होते. रात्री 10 ते 11 च्या दरम्यान केवळ एका तासात 4,50,013 रिटर्न भरले गेले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.