AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Filling | प्राप्तिकर रिटर्न न भरल्यास केस आणि थेट जेल, हे पाच तोटे माहिती आहेत का?

ITR Filling | व्यवसायात कोणत्याही प्रकारचा तोटा झाला म्हणून कोणालाही आयकर रिटर्नमध्ये तो सेटल करता येणार नाही. ही सुविधा त्याच व्यक्तीला मिळेल, जी वेळेवर कर रिटर्न भरेल. त्यामुळे अंतिम मुदतीपर्यंत विवरणपत्र भरा.

ITR Filling | प्राप्तिकर रिटर्न न भरल्यास केस आणि थेट जेल, हे पाच तोटे माहिती आहेत का?
हे पाच तोटे माहिती आहेत का?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 31, 2022 | 1:31 PM
Share

ITR Filling | आज 31 जुलै ही प्राप्तिकर रिटर्न (ITR Filling) भरण्याची निर्धारीत अंतिम मुदत आहे. तांत्रिकदृष्ट्या, आज आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत (Last Date) आहे. उद्यापासून विलंब शुल्क (Late Fee) आणि दंडासहित (Penalty) आयटीआर भरावा लागणार आहे. त्यासाठी आयकर कायदा 1961 (Income Tax Act) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला दंडाची रक्कम जमा करावी लागणार आहे. जर तुम्ही आजच विवरणपत्र (Return) जमा केले तर परताव्यासाठी तुम्हाला दावा दाखल करता येईल. परंतू, सरकारने आता आयटीआर भरण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्यास नकार दिल्याने आजच तुम्हाला आयकर परतावा जमा करावा लागणार आहे. आज रविवार असून अंतिम मुदतीचा दिवस असल्याने करदात्यांच्या विवरणपत्र जमा करण्यासाठी उड्या पडल्या आहेत. त्यामुळे काहीशी अडचण येत असेल. आता तुम्हाला आयटीआर भरण्याचे फायदे माहिती आहेत. पण आयटीआर वेळेत न भरण्याचे तोटे (pitfalls of non-filing of ITR) ही समजून घ्या. आजचा दिवस उलट्यानंतर कोणकोणते नुकसान होऊ शकते, जाणून घेऊयात.

थेट तुरुंगवारी

मुदतीत प्राप्तीकर रिटर्न भरले नाही, तर अशा करदात्यांवर कारवाई होऊ शकते. तुरुंगवासही होऊ शकतो. पण त्यासाठी तरतुदी आहेत. जेव्हा तुम्हाला ईमेलवर किंवा फोन मेसेजमध्ये आगाऊ नोटीस पाठवली जाते. तरीही तुम्ही अंतिम मुदतीचे पालन करून ITR भरत नाही, तेव्हा करदात्याला तुरुंगाची हवा खावी लागते. कर अधिकाऱ्याला वाटत असेल की तुम्ही रिटर्न मुद्दाम भरले नाही, तर तो तुमच्याविरुद्ध खटला चालवू शकतो. कायद्यातील तरतुदीनुसार, तुरुंगवासाची शिक्षा 3 महिने ते 2 वर्षांपर्यंत असू शकते, तसेच नुकसान भरपाई ही भरावी लागेल. जर कर दायित्व जास्त असेल, तर तुरुंगवासाची शिक्षा 7 वर्षांपर्यंत असू शकते.

दंड भरावा लागेल

अनेक वेळा लोक त्यांच्या कर दायित्वाबद्दल कमी माहिती देतात. चुकीची कर अहवाल माहिती दिल्याबद्दल तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम तुमच्या कराच्या 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. कर विभागाच्या या कारवाईशिवाय तुमच्यावर इतरही अनेक दंड आकारला जाऊ शकतो.

तोट्याची तडजोड नाही

व्यवसायात कोणत्याही प्रकारचा तोटा झाला असेल तर त्यात प्राप्तिकर खात्यातंर्गत करासाठी तडजोड होत नाही. मात्र वेळेत प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्या करदात्याला त्यात दिलासा मिळू शकतो. जर रिटर्न देय तारखेच्या आत भरला नाही, तर तुम्ही भविष्यातील कोणत्याही नफ्यावर हे नुकसान सेट करू शकत नाही. अपवाद, घराच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास, तोट्याची तडजोड करता येते.

व्याज देखील भरावे लागेल

रिटर्न उशिरा भरल्यास केवळ दंड भरावा लागणार नाही, तर कराच्या रकमेवर व्याजही भरावे लागेल. कलम 234A अंतर्गत, दरमहा देय करावर 1% दराने व्याज भरावे लागेल. त्यामुळे जोपर्यंत कर भरला जात नाही तोपर्यंत आयटीआर भरण्याची परवानगी दिली जाणार नाही. कलमांतर्गत व्याजाची गणना अंतिम मुदतीनंतरच्या तारखेपासून सुरू होईल, म्हणजे 2021-22 आर्थिक वर्षासाठी 31 ऑगस्ट 2022 या तारखेपासून व्याजाचे चक्र सुरु होईल. त्यामुळे, तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

परतावा मिळण्यास विलंब

ITR उशीरा भरला म्हणजे उशीरा परतावा मिळेल. तुम्ही लवकरच टॅक्स रिटर्न भरल्यास रिफंडही लवकरच मिळेल. समजा तुमचा टीडीएस जास्त कापला गेला असेल किंवा तुम्ही चुकून जास्त कर भरला असेल, तर रिटर्न अंतिम मुदतीपूर्वी भरले पाहिजे. तसे न केल्यास परतावा मिळण्यास विलंब होईल.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.