Jalgaon Gold : जळगावमध्ये सोने हजारांनी महाग तर चांदी इतक्या रुपयांनी महागली, काय आहेत किंमती?

Jalgaon Gold-Silver Price : सोन्याचे भाव प्रति तोळा ७३,९०० रुपयांवर तर चांदी ८७ हजार रुपये प्रति किलोवर पोहचला. अमेरिकन आर्थिक स्थितीचा परिणाम झाल्याने ही भाववाढ झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकानी दिली आहे. आगामी काळात बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीकडे गुंतवणुकीचा कल वाढला आहे.

Jalgaon Gold : जळगावमध्ये सोने हजारांनी महाग तर चांदी इतक्या रुपयांनी महागली, काय आहेत किंमती?
जळगावमध्ये महागले सोने आणि चांदी
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 9:01 AM

गेल्या अनेक दिवसांपासून थोडाफार चढ-उतार सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भावात शुक्रवारी मोठी वाढ झाली. एकाच दिवसात चांदीच्या भावात चार हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार रुपये प्रति किलो तर सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते ७३ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव ७२ हजारांपासून कमी-जास्त होत राहिले व गुरुवारी ते ७२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी त्यात थेट एक हजार रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

आगामी काळात बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीकडे गुंतवणुकीचा कल वाढला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव या घाडमोडींमुळे वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिक यांनी सांगितले. आगामी काळात हे दोन्ही धातू मोठी आघाडी घेण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव ७२ हजारांपासून कमी-जास्त होत राहिले व गुरुवारी ते ७२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी त्यात थेट एक हजार रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

९ वर्षांचे गणित काय?

हे सुद्धा वाचा

वर्ष २०१५ मध्ये सोन्याचा भाव २४,७४० रुपये प्रति १० ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी ९ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यापूर्वी पण सोन्याच्या किंमती ९ वर्षांच्या कालावधीत तिप्पट झाल्या होत्या. वर्ष २००६ मध्ये सोन्याचा भाव ८,२५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतींना तिप्पट होण्यासाठी जवळपास १९ वर्षे लागली होती. वर्ष १९८७ मध्ये सोन्याचा भाव २,५७० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती तिप्पट होण्यासाठी ८ वर्षे आणि ६ महिने लागले होते

१४ ते २४ कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७३,०४४, २३ कॅरेट ७२,७५२, २२ कॅरेट सोने ६६,९०८ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५४,७८३ रुपये, १४ कॅरेट सोने ४२,७३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८६,१११ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.