अरे व्वा! तब्बल 21 हजारांचं सोनं चक्क मोफत मिळणार, मुकेश अंबानींच्या कंपनीची भन्नाट ऑफर आहे तरी काय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स या कंपनीने एक जबरदस्त आणि धमाकेदार ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे या ऑफरअंतर्गत तुम्हाला तब्बल 21 हजार रुपयांपर्यंत मोफत सोनं मिळू शकतं.

Jio Gold 24k Days Offer : अक्षयतृतीया हा दिवस हिंदू दिनदर्शिकेत सर्वाधिक शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी केलेल्या कोणत्याही कामातून सुख आणि समृद्घी मिळते, असे म्हटले जाते. याच कारणामुळे या दिवशी देशात सगळीकडे लोक सोन्यांचे दागिने खरेदी करतात. हाच शुभ दिवस लक्षात घेऊन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स या कंपनीने एक जबरदस्त आणि धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला चक्क दोन टक्के सोनं मोफत मिळू शकतं. मोफत मिळणारं हे सोनं 21 हजार रुपयांपर्यंत असू शकतं.
नेमकी ऑफर काय आहे?
ही ऑफर मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स या कंपनीतर्फे देण्यात आली आहे. या ऑफरचे नाव ‘जिओ गोल्ड 24K डेज’ असे आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी केल्यास तुम्हाला 2 टक्क्यांपर्यंत सोनं मोफत मिळू शकतं. ग्राहकांसाठी ही ऑफर 29 एप्रिल 2025 ते 5 मे 2025 पर्यंत असणार आहे.
नेमकं काय करावं लागणार?
जिओ फायनान्स या कंपनीने डिजिटल सोनं खरेदी करण्याचा पर्यंय फारच सुकर केला आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 9999 रुपयांपर्यंत सोने खरेदी केल्यास तुम्हाला खरेदी केलेल्या सोन्याच्या किमतीच्या 1 टक्के सोने मोफत दिले जाईल. तर 10 हजार रुपयांच्या पुढे सोन्याची खरेदी केली तर तुम्हाला खरेदी केलेल्या सोन्याच्या किमतीवर 2 टक्के सोनं मोफत मिळेल. या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 1 टक्के सोन्यासाठी JIOGOLD1 आणि 2 टक्के सोन्यासाठी JIOGOLDAT100 हा प्रोमो कोड वापरावा लागणार आहे. या ऑफरच्या कालावधीत एक व्यक्ती 10 वेळा सोन्याची खरेदी करू शकतो.
अन्य अटी काय?
डिजिटल गोल्डसाठी ग्राहकांना सोने खरेदी केल्यानंतर साधारण 72 तासांची वाट पाहावी लागेल. त्यानंतरच ग्राहकांना मोफत मिळालेले सोने त्यांच्या खात्यात जमा झालेले दिसेल. एक ग्राहक जास्तीत जास्त 21 हजार रुपयांपर्यंतच मोफत सोन मिळवू शकतो. एकरकमी केलेल्या सोन्यावरच ही ऑफर लागू असेल. गोल्ड एसआयपीवर ही ऑफर लागू नसेल.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)
