Share Market: गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका लाखाचे बनले ८० कोटी
शेअर बाजारामुळे अनेकांचे नशीब चमकले आहे. अशातच आता एका शेअरमुळे एक गुंतवणूकदार मालामाल बनला आहे.एका व्यक्तीला एका लाखाच्या गुंतवणूकीवर ८० कोटी रूपयांचा परतावा मिळाला आहे.

तुमच्यापैकी अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूक करत असतील. शेअर बाजारामुळे अनेकांचे नशीब एका रात्रीत चमकले आहे. अशातच आता एका शेअरमुळे एका गुंतवणूकदाराचे नशीब उजळले आहे. सौरव दत्ता नावाच्या एका व्यक्तीने सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे. यात त्याने एका लाखाचे ८० कोटी रूपये झाल्याचे सांगितले आहे. हा शेअर कोणता आहे ते जाणून घेऊयात.
एका लाखाचे बनले ८० कोटी
सौरव दत्ता नावाच्या व्यक्तीने सांगितले की त्याने वडिलांकडून मिळालेल्या शेअर्सवर ८० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्याच्या १९९० च्या दशकामध्ये त्याच्या वडिलांनी १ लाख रुपयांचे JSW चे शेअर्स खरेदी केले होते, ज्याची किंमत आज ८० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हा व्यक्ती मालामाल झाला आहे. सौरव दत्ता यांच्या पोस्टबाबत बोलताना @marketanalogy नावाच्या एका गुंतवणूकदाराने म्हटले की, चांगले शेअर्स विकण्यासाठी घाई करू नका. जर पैशांची गरज नसेल तर ते वकू नका, वेळेनुसार पैसे वाढतील.
कंपनीचे मार्केट कॅप २.४६ लाख कोटी रुपये
जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरची किंमत १००९.५० रुपये आहे. या कंपनीचे एकूण मूल्य २.४६ लाख कोटी रुपये आहे. या स्टॉकमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. २० वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना २,४८४.३४ टक्के परतावा मिळालेला आहे. तर गेल्या पाच वर्षांतच या शेअरची किंमत ४३३.६९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.
गुंतवणुकीची शक्ती
शेअर बाजारात नियमित गुंतवणूक केल्याने तुम्ही करोडपती बनू शकता. गुंतवणूक करताना फक्त हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी दरमहा गुंतवणूक सुरु ठेवावी. तुम्ही कोणत्याही फंडात गुंतवणूक करत असला तरी दरमहा पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. यामुळेतुमची गुंतवणूक रक्कम वाढत राहील. तसेच त्यावर मिळणारे व्याज चक्रवाढ व्याजाद्वारे वाढत राहील. चक्रवाढीमुळे तुमची गुंतवणूक दुप्पट किंवा चौपट देखील होऊ शकते.
टीप – वरील लेखात दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे आर्थिक जोखमीचे काम आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. वरील लेख वाचून एखाद्याने गुंतवणूक केल्यास, आणि त्याला आर्थिक फटका बसल्यास टीव्ही ९ मराठी जबाबदार असणार नाही.