FasTag | फास्टॅगमधून चुकून दोनवेळा पैसे गेले? घाबरू नका ‘असे’ मिळतील परत!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Jan 14, 2021 | 6:15 PM

फास्टॅगमुळे टोल प्लाझावर आपल्याला पैसे देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. थेट आपल्या बँक खात्यातून पैसे वजा केले जातात.

FasTag | फास्टॅगमधून चुकून दोनवेळा पैसे गेले? घाबरू नका ‘असे’ मिळतील परत!

मुंबई : टोल भरण्यासाठी वाहनाला फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून सर्व गाड्यांना फास्टॅग लावणे सरकारने बंधनकारक केले आहे. वास्तविक, फास्टॅगमुळे टोल प्लाझावर आपल्याला पैसे देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. थेट आपल्या बँक खात्यातून पैसे वजा केले जातात. यामुळे वेळेचीही बचत होते. परंतु, बर्‍याच वेळा एखाद्या त्रुटीमुळे आपल्या खात्यातून दोनदा पैसे वजा केले जातात (Know about Fastag complaints and dispute transactions and refunds).

अशा परिस्थितीत आपल्याला पुन्हा टोल बूथवर जाण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याचीही गरज नाही. जर चुकीमुळे आपले पैसे वजा झाले असतील, तर संबंधित टोल कंपनीकडून आपले पैसे परत केले जातील. यासाठी, आपल्याला काही सोप्या पद्धतींचे अनुसरण करावे लागेल. त्यानंतर आपल्याला घर बसल्या हे पैसे परत मिळतील. फास्टॅगमधून गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात घ्या.

अशाप्रकारे करा क्लेम :

– आपल्याला फास्टॅगवर काही सूट मिळाली असेल आणि त्याचा आपल्याला लाभ मिळाला नसेल, तर आपण तक्रार नोंदवू शकता. यानंतर आपले पैसे परत केले जातील.

– तुमच्या टोलची मोजणी योग्य प्रकारे केली गेली नसेल, तर तुम्हाला पैसे परत मिळतील.

– तुमची गाडी कोणत्याही टोल प्लाझावरुन गेली नसेल आणि तरीही तुमच्या खात्यातून पैसे कपात केले गेले असतील तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

– जर एकाच टोल प्लाझामधून एकपेक्षा अधिक वेळा टोल वजा केला गेला असेल, तर तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळवण्याचे अधिकार आहे.

– आपल्या वाहनानुसार टोल घेतला गेला नसेल, तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकता.

– बर्‍याच वेळा टोल ओलांडताना सर्व पैसे वजा केले जात नाहीत, त्याऐवजी नंतर आपल्याला खात्यातून पैसे काढून घेतले जातात. अशावेळी जास्त पैसे द्यावे लागले तर, आपल्याला आपले अतिरिक्त पैसे परत मिळतील.

– जर तुम्ही टोल प्लाझावर फास्टॅगही वापरला असेल आणि रोकड पैसेही दिले असतील, तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.

– आपल्याकडे स्थानिक किंवा महिन्याचा पास असल्यास आणि सवलत लागू नसल्यास आपण आपली तक्रार नोंदवू शकता.

– या अडचणींशिवाय आपल्या फास्टॅगमध्ये काही समस्या असल्यास आपण त्याबद्दल तक्रार करू शकता.

(Know about Fastag complaints and dispute transactions and refunds)

तक्रार करण्यासाठीचा वेळ?

– जर आपल्याला फास्टॅगबद्दल काही तक्रार असेल, तर आपण त्या व्यवहारादिवसापासून 30 दिवसांच्या आत तक्रार दाखल करू शकता.

– आपल्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीचे निराकरण केवळ 15 दिवसात केले जाईल. तक्रार दाखल केल्यानंतर हे दिवस मोजले जातील.

तक्रार कशी नोंदवावी?

आपले पैसे चुकीच्या पद्धतीने वजा केले गेले असतील, तर आपण तक्रार करू शकता. यासाठी प्रथम आपल्याला फास्टॅग पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. त्यामधील लॉगिन बटणावर जाऊन वरच्या मेनूवर क्लिक केल्यानंतर ‘Help Desk’ वर क्लिक करा. त्यामध्ये ‘Raise Request/Complaint’वर क्लिक करा, नंतर ‘Dispute Transaction/Chargeback’ वर क्लिक करा. यानंतर ‘Subtype’वर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा. नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

(Know about Fastag complaints and dispute transactions and refunds)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI