आजपासून 10, 20, 25, 30 वर्षांनंतर 1 कोटींची किंमत किती असेल? जाणून घ्या

कारण 10 वर्षांपूर्वी याच किंमतीत तुम्हाला आजपेक्षा अधिक वस्तू खरेदी करता येत होत्या. (know value of 1 crore after 15 20 and 30 years what expert says)

आजपासून 10, 20, 25, 30 वर्षांनंतर 1 कोटींची किंमत किती असेल? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 7:30 AM

Investment tips मुंबई : प्रत्येकजण आपल्या उतारवयासाठी काही ना काही ठराविक पुंजी जमा करत असतो. जर तुम्हालाही वृद्धापकाळासाठी 1 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी अनेक SIP योजना उपलब्ध आहेत. एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही या योजनांची माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा तुम्हाला किती पैसे जमा करावे लागतात. तसेच गुंतवणूकीवरील परतावा किती मिळेल, याची तुम्हाला सहज माहिती मिळेल. म्हणजेच जर आपण एखाद्या योजनेत दरमहा 10 हजार रुपये जमा केले ज्याचे परतावा दरवर्षाला 12 टक्के आहे, तर 20 वर्षानंतर तुमचा निधी 1 कोटी होईल. (know value of 1 crore after 15 20 and 30 years what expert says)

मात्र जेव्हा तुम्ही भविष्यकालीन गुंतवणुकीबाबत विचार करतो, तेव्हा आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे महागाईचा दर… सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आज 1 कोटींची बाजारात जेवढी किंमत आहे, तीच किंमत 10, 20, 25, 30 वर्षांनंतर राहणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भविष्यात 1 कोटींचे मूल्य किती राहील, याची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. महागाईमुळे चलनाचे मूल्य कमी होतं आहे. आता तुम्ही एक लाख रुपयात जेवढे सामान खरेदी करु शकता, तेवढेच सामान तुम्ही 10 वर्षांनंतर खरेदी करु शकणार नाही. कारण 10 वर्षांपूर्वी याच किंमतीत तुम्हाला आजपेक्षा अधिक वस्तू खरेदी करता येत होत्या.

भविष्यात 1 कोटींचे मूल्य नेमके किती?

तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाल्यास समजा आता महागाईचा दर हा 5 टक्के असेल तर 1 कोटींचे मूल्य 15 वर्षानंतर 48 लाख एवढी असेल. तर 20 वर्षानंतर त्याची किंमत 37.68 लाख, 25 वर्षांनंतर 29.53 लाख आणि 30 वर्षांनंतर 23.13 लाख रुपये असेल. हा अंदाज काढण्यासाठी महागाईचा दर 5 टक्के निश्चित ठेवण्यात आला आहे

महागाईचा दर 5-6 टक्के राहण्याचा अंदाज

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, येत्या काही वर्षांत सर्वसाधारण महागाईचा दर हा 5-6 टक्के इतका राहण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेने येत्या पाच वर्षांत महागाईचा दर हा 4 टक्क्यांवर ठेवले आहे. यात +/- 2 टक्के कंसात ठेवण्यात आले आहे. एखाद्या वैद्यकीय आणि शैक्षणिक चलनवाढीचा परिणाम दीर्घकालीन कालावधीत अधिक वाढ होईल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची तयारी करत असाल, तर या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे.

मुलांच्या भवितव्यासाठी बचत कशी कराल?

समजा सध्या MBA ची फी ही 15 लाख रुपये इतकी आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी बचत करत असाल, तर 20 वर्षानंतर 7 टक्के महागाईच्या दराने हे मूल्य 40 लाख होईल. अशा परिस्थितीत तुमचे लक्ष्य हे 15 लाख नव्हे तर 40 लाख असले पाहिजे.

(know value of 1 crore after 15 20 and 30 years what expert says)

संबंधित बातम्या : 

सातवा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनर्सबाबत महत्वाची बातमी, आता तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार अपडेट

मुकेश अंबानींची कंपनी 3 वर्षात देणार 10 लाख नोकऱ्या, गुरुवारी केली घोषणा

एसबीआय कार्डने फॅबइंडियासोबत लाँच केले कॉन्टॅक्टलेस को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, गिफ्ट व्हाउचरसह मिळतील हे फायदे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.