Gold-Silver Price Today | सोनं-चांदीच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या आजचे दर

आज सकाळी जेव्हा बाजार उघडला तेव्हा फेब्रुवारीच्या सोन्याच्या वायदा भाव 85 रुपयांच्या तेजीसह 49,130 रुपए प्रति तोळ्यावर उघडला.

Gold-Silver Price Today | सोनं-चांदीच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या आजचे दर
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली : कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सध्या सोनं आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे (Latest Gold-Silver Price). आज सकाळी जेव्हा बाजार उघडला तेव्हा फेब्रुवारीच्या सोन्याच्या वायदा भाव 85 रुपयांच्या तेजीसह 49,130 रुपए प्रति तोळ्यावर उघडला. तर सकाळी 11 वाजता सोनं 318 रुपयांनी वाढून 49,363 प्रति तोळ्यावर पोहोचला. तसेच, एप्रिलच्या सोन्याच्या दरात 319 रुपयांची वाढ होऊन 49,353 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे (Latest Gold-Silver Price).

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही सध्या वाढ पाहायला मिळत आहे. मार्चच्या चांदीच्या भावात आज सकाळी  MCX वर 594 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव 66,500 रुपए प्रति किलोग्राम पर्यंत पोहोचला होता. सकाळी 11.10 वाजता चांदीच्या भावात 114 रुपयांच्या तेजीसह 66,020 रुपये प्रति किलोवर पोहोचली. मेच्या चांदी दरातही वाढ होत आहे. त्याचा सध्याचा भाव 67,160 रुपये प्रति किलो इतका आहे.

कुठल्या शहरात सोन्याचा आजचा भाव?

मुंबई –

सोने – 49,590 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,300 रुपये प्रति किलो

पुणे –

सोने – 49,590 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,300 रुपये प्रति किलो

जळगाव –

सोने – 51,479 प्रति तोळा

चांदी – 67,648 प्रति किलो

नागपूर –

सोने – 49,590 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,300 रुपये प्रति किलो

नाशिक –

सोने – 49,590 रुपये प्रति तोळा

चांदी – 66,300 रुपये प्रति किलो

सरकार विकतंय स्वस्त सोनं

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bonds) ची दहावी मालिकेंतर्गत 11 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करू शकता. यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख 19 जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत 5104 रुपये ठेवली आहे. जर कोणत्याही गुंतवणूकदारानं यासाठी ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5054 रुपये असेल.

Latest Gold-Silver Price

संबंधित बातम्या :

सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, ‘ही’ आहे शेवटची तारीख

सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर

Published On - 1:33 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI