AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर्स तारण ठेऊन मिळवा कर्ज, देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करा व्यवहार 

कर्जासाठी शेतजमीन, मालमत्ता, सोने आणि इतर गोष्टी आपण तारण म्हणून ठेवतो. पण आता शेअर मार्केटमधील तुम्ही निवडलेले शेअर ही कर्ज मिळविण्यासाठी तुमची साथ देतील. पूर्वीसारखी किचकट प्रक्रिया ही त्यासाठी लागणार नाही. देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन हा व्यवहार तुम्ही झटक्यात पूर्ण करु शकता. 

शेअर्स तारण ठेऊन मिळवा कर्ज, देशातील पहिल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर करा व्यवहार 
debt relief Don't lend today by mistake or you will suffer bad consequences
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 9:01 AM
Share

मुंबई : शेतजमीन, सोने-चांदी, मालमत्ता, घर याशिवाय ग्राहकांना शेअर तारण ठेऊनही कर्ज घेता येऊ शकते. पूर्वीची किचकट प्रक्रिया न राहता आता हा व्यवहार आणखी सोपा झाला आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत तुम्हाला कर्ज हवे असेल तर त्यासाठी शेअर तारण म्हणून ठेवता येतील. हा व्यवहार  नॅशनल सिक्युरिटीज  डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) यांच्या देखरेखीखाली असेल. त्यामुळे या व्यवहारातून कुठलाही धोका राहणार नाही. तात्काळ पैशांची गरज यामुळे भागेल. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक सर्व बाजूंनी तुम्हाला फायदेशीर ठरेल. विशेष म्हणजे हा व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. कर्ज रक्कम तुमच्या सुविधेनुसार तुम्हाला वापरता येईल.

जिओजीत क्रेडिट्स कडून ऑनलाईन कर्ज पुरवठा

ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस (Geojit Financial Services) यांच्या जिओजित क्रेडिट्स (Geojit Credits) यांनी यासाठी पुढाकार घेतला. शेअरच्या बदल्यात कर्ज देण्याची त्यांनी सुविधा सुरु केली आहे. त्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. नॅशनल सिक्युरिटीज  डिपॉझिटरी लिमिटेड(NSDL) यांच्या देखरेखीखाली हा व्यवहार होईल. एनएसडीएलकडे नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही डीमॅट खातेधारकाला सहजासहजी शेअरवर आधारीत कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वेळेवर कर्ज मिळण्यासाठीची धावपळ वाचविता येईल.

मनिकंट्रोल संकेतस्थळानुसार (MoneyControl.com), कोच्ची येथे बोलताना एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मजा चंद्रु यांनी या सेवेबद्दल माहिती दिली. शेअरवर कर्ज मिळवून देण्याच्या सुविधेबाबत बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. खातेधारकांना लवकर तरल चलन अर्थात कर्जाची रक्कम उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे खातेधारकांना अडचणीच्या काळात त्वरीत खर्च भागविण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल असे त्यांनी सांगितले. यामुळे गुंतवणुकदारांना गुंतवणूक करण्याची प्रेरणा मिळेल आणि त्यातून अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत त्यांना खर्च करण्याजोगी रक्कम हाती येईल असे त्यांनी सांगितले.

कोणाला मिळेल कर्ज

जिओजित ग्रुप चे संस्थापक आणि संचालक सी. जे.जॉर्ज (C J Jorge) यांनी या सुविधेच्या उद्धघाटनपर कार्यक्रमात शेअरवर कर्ज मिळण्याबाबतची भूमिका विषद केली. कर्ज सुविधा मिळण्यासाठी शेअर होल्डरकडे (Share Holder) योग्य शेअर (Eligible Share)उपलब्ध हवेत. त्याआधारे त्यांना या डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन कर्ज उपलब्ध करुन देता येईल असे त्यांनी सांगितले. कर्ज मिळण्यास योग्य शेअर असल्यास खातेधारकाला जिओजित क्रेडिटच्या एलएएस अर्थात लोन अंगेस्ट शेअर या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहज कर्ज मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कर्ज मिळण्यासाठी ग्राहकाचा सिबिल स्कोर (Cibil score) ही चांगला हवा. तसेच कोणत्या ब्रोकरकडे डिमॅट अकाऊंट असणा-या खातेधारकाला ही सेवेतून कर्ज मिळेल.

संबंधित बातम्या :

GDP मीटर : नव्या व्हेरियंटची मार्केटला धास्ती, अर्थचक्राच्या गतीला ‘ओमिक्रॉन’मुळं ब्रेक?

गृहकर्ज हस्तांतरण करणे बचतीचे आणि फायदेशीर, ‘अशी’ आहे एसबीआयची व्यवहारिक आकडेमोड

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.