LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, नवे दर काय?

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत जाहीर करतात. (LPG Cylinder Latest Price) 

LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, नवे दर काय?
LPG

मुंबई : भारतीय तेल विपणन कंपन्यांनी जून महिन्यांसाठी (LPG Gas Cylinder Price Today) घरगुती गॅस दर जाहीर केले आहेत. यानुसार राजधानी दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत (LPG Gas Cylinder Price in Delhi) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 123 रुपयांची घट करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत जाहीर करतात. (LPG Cylinder Latest Price)

तेल कंपन्यांनी जून महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या 14.2 किलो किंमतीत कपात केलेली नाही. म्हणजेच हा सिलिंडर जुन्या किंमतीतच मिळणार आहे. नवी दिल्लीत अनुदानित गॅस सिलिंडरची सध्याची किंमत ही 809 रुपये आहे. मात्र दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हा सिलिंडर 1473.5 रुपयांना उपलब्ध असेल.

मुख्य शहरांतील गॅस सिलेंडरचे दर

शहरं                  किंमत

दिल्ली                809.00 रुपये

मुंबई                  809.00 रुपये

कोलकाता          835.50 रुपये

चेन्नई                  825.00 रुपये

विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे नवे दर

तेल कंपन्यांनी 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. सध्या एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 809 रुपये, कोलकातामध्ये 835 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईमध्ये 825 रुपये इतकी आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत काय?

सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार, दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 122 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर्सची किंमत 1473.5 रुपये होती.

कोलकातामध्ये या सिलिंडरच्या किंमतीत 123 रुपयांनी घट करण्यात आली असून तो 1544.5 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत हा सिलिंडर 122.5 रुपयांनी घसरुन 1422.5 रुपये इतका झाला आहे. तसेच चेन्नईमध्ये 122.5 रुपयांनी घसरून 1603 रुपयांवर गेले.

एलपीजी किंमत कशी तपासाल?

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) इ या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता. (LPG Cylinder Latest Price)

संबंधित बातम्या : 

आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम

क्रिप्टोकरन्सीने उजळले तीन भारतीय तरुणांचे नशिब; अल्पावधीत बनले अब्जाधीश

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोठी बातमी; 1 जूनपासून नवे नियम लागू, गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI