LPG cylinder price: सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची झळ, LPG सिलिंडर महागला, पटापट तपासा

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झालीय.

LPG cylinder price: सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची झळ, LPG सिलिंडर महागला, पटापट तपासा
Lpg Gas Cylinder Booking

नवी दिल्लीः LPG Gas Cylinder : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सामान्य माणसाला मोठा झटका बसलाय. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 75 रुपयांनी वाढ झालीय.

आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.5 रुपये झाला. तर आधी 859.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दिल्लीत एलपीजीची किंमत 834.50 रुपयांवरून 859.50 रुपये करण्यात आली. 15 दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झालेत.

अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरची नवी किंमत

दिल्लीमध्ये 14.2 किलो सिलिंडरची सबसिडीशिवाय किंमत 859.50 रुपयांवरून 884.50 रुपये झाली. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत आता 875.50 रुपयांऐवजी 911 रुपये झाली, 900.5 रुपये मोजावे लागतील.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवी किंमत

दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.

एलपीजी सिलिंडर यंदा 190.5 रुपयांनी महागले

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. वर्ष 2021 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी आता वाढून 884.50 रुपये झाली. अशा प्रकारे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आतापर्यंत 9 महिन्यांत 190.50 रुपयांची वाढ झाली.

सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढल्या

29 ऑगस्ट रोजी सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने CNG आणि PNG च्या किमतीत वाढ केली. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दिल्ली-एनसीआर (नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद) मध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढल्यात. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत आता 50.90 रुपये प्रति किलोवर गेली आहे. त्याचप्रमाणे पीएनजीची किंमत या शहरांमध्ये प्रति एससीएम 30.86 रुपये झाली.

LPG ची किंमत कशी तपासायची?

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

संबंधित बातम्या

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; तुम्हाला किती कर्ज मिळणार, जाणून घ्या

चांगली बातमी! PMC Bank च्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरपासून 5 लाख मिळणार, जाणून घ्या

LPG cylinder price: Inflation in the pocket of common man, LPG cylinder expensive, check quickly

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI