AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Price Cut | दर कपातीनंतर घरगुती गॅसची किंमत किती? तुमच्या शहरातील भाव येथे करा चेक

LPG Price Cut | लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्याअगोदरच मोदी सरकारने नारी शक्तीला वंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली होती.

LPG Price Cut | दर कपातीनंतर घरगुती गॅसची किंमत किती? तुमच्या शहरातील भाव येथे करा चेक
| Updated on: Mar 08, 2024 | 11:38 AM
Share

नवी दिल्ली | 8 March 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने किचन बजेटमध्ये थोडा दिलासा दिला. जागतिक महिला दिनी, मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. गॅस सिलेंडरच्या किंमती एकूण 300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. जून 2023 मध्ये गॅस सिलेंडर 1100 रुपयांवर पोहचल्या होत्या. गेल्या सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 902.50 रुपये होता. गॅस सिलेंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला आहे.

सात महिन्यांपासून नाही दरवाढ

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच समोर येईल.

काय केले ट्विट

महिला दिवसाचे औचित्य साधत आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नारी शक्ती म्हणून महिलांचे आयुष्य सोपे होईल. कोट्यवधी कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होईल. हे पाऊल पर्यावरण सुरक्षेसाठी पण मदतीचे ठरेल. त्यामुळे सर्व कुटुंबांचे आरोग्य चांगले होईल.

कोणत्या शहरात काय किंमती (Goodreturns Price)

  • मुंबईत 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 802 रुपये आहे.
  • पुण्यात 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 806 रुपये
  • कोल्हापूर शहरात 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 806 रुपये
  • नाशिकमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 806 रुपये
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसचा भाव 811 रुपये
  • अमरावती शहरात 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 836 रुपये
  • नांदेडमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 828 रुपये
  • उपराजधानी नागपूरमध्ये 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसचा भाव 854रुपये

उज्ज्वला सबसिडीला मुदतवाढ

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलिंडरबाबत पण मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडवरील अनुदान एक वर्षांसाठी वाढविण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेतंर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या कालावधीत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल