Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 हजाराचे एकाच वर्षात 12 लाख; या मल्टिबॅगर शेअरने आणली कमाईची लाट

Multibagger Stocks : या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. या कंपनीने 40 हजार रुपयांचे अवघ्या एका वर्षात 12 लाख रुपये केले. या कंपनीचे 3 लाखांहून अधिक ट्रांसफॉर्मर जगभरात वापरण्यात येतात. या कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षातच जोरदार कमाई करुन दिली. त्यांना 3,074.56 टक्क्यांचा परतावा दिला.

40 हजाराचे एकाच वर्षात 12 लाख; या मल्टिबॅगर शेअरने आणली कमाईची लाट
मल्टिबॅगर शेअर
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 3:18 PM

भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आतच हजार पटीने परतावा दिला आहे. या मल्टिबॅगर स्टॉकने पण नवीन विक्रम रचला आहे. या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 3,074.56 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीने 40 हजार रुपयांचे अवघ्या एका वर्षात 12 लाख रुपये केले. या कंपनीचे 3 लाखांहून अधिक ट्रांसफॉर्मर जगभरात वापरण्यात येतात. आता कंपनीने कमाईत सुद्धा नवीन उच्चांक गाठला आहे.

काय आहे या मल्टिबॅगर शेअरचे नाव?

Marsons Ltd असं या मल्टिबॅगर शेअरचे नाव आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी 40 हजार 560 रुपयांची गुंतवणूक केली असत तर आज ही गुंतवणूक 12 लाख 87 हजार 600 रुपये इतकी झाली असती. 4 डिसेंबर 2023 रोजी Marsons Ltd या शेअरची किंमत 8.45 रुपये होती. ती आज 268.25 रुपये इतकी वाढली आहे. या कंपनीने एकाच वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 3,074.56% परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीचे कसे आहे फंडामेंटल?

मार्सन्स लिमिटेड (Marsons Ltd) शेअरचे फंडामेंटल्सचा विचार करता, मंगळवारी बाजार बंद होताना या कंपनीचे मार्केट कॅप 4,617 कोटी रुपये होते. या स्टॉकचा पीई 347 इतका आहे. Marsons Ltd चा ROCE 3.14 टक्के इतका आहे. तर या कंपनीचा ROE 7.31 टक्के इतका आहे. या शेअरची बुक व्हॅल्यू 6.23 रुपये आहे. तर फेस व्हॅल्यू 1 रुपये आहे.

मार्सन्स लिमिटेड कंपनी करते काय?

मार्सन्स लिमिटेड कंपनीचे 3 लाखांहून अधिक ट्रांसफॉर्मर जगभरात वापरण्यात येत आहेत. कंपनीने केवळ भारतातच नाही तर इंग्लंड, इथेयोपिया, दुबई, जॉर्डन आणि बांग्लादेश सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारात धाक जमवला आहे. ही कंपनी राज्याचे विद्युत मंडळ, ऊर्जा वापर करणाऱ्या संस्था आणि इतर बड्या कंपन्यांना सेवा प्रदान करते.

मार्सन्स कंपनीने एबीबी, एल्सटॉम, श्नाइडर इलेक्ट्रिक आणि जीई पॉवर यासारख्या दिग्गज कंपन्यासोबत करार केला आहे. या बड्या कंपन्यांमुळे बाजारात या कंपनीचा मोठा शेअर आहे. या कंपनीवर जागतिक बाजाराचा विश्वास आहे. Q1FY25 मध्ये या कंपनीच्या विक्रीत 12,891.3% वाढ झाली. कंपनीने 29.88 कोटींची विक्री केली. तर , Q1FY24 मध्ये हा आकडा केवळ 0.23 कोटी रुपये होता.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.