AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांच्यासह 8 दिग्गजांचे 2 लाख कोटी बुडाले, नेमके काय झाले?

शेअर बाजारात घसरण झाली असताना एफएमसीजी कंपनी एचयूएल आणि एनबीएफसी कंपनी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. या कंपनीचे मूल्यांकन वाढले आहे. देशातील टॉप १० पैकी कोणत्या ८ कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाले आहे.

मुकेश अंबानी यांच्यासह 8 दिग्गजांचे 2 लाख कोटी बुडाले, नेमके काय झाले?
मुकेश अंबानी
| Updated on: Jul 13, 2025 | 11:17 AM
Share

मागील आठवड्यात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. परंतु देशातील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले आहे. विशेष म्हणजे टीसीएस, एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

शेअर बाजारात घसरण झाली असताना एफएमसीजी कंपनी एचयूएल आणि एनबीएफसी कंपनी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. या कंपनीचे मूल्यांकन वाढले आहे. देशातील टॉप १० पैकी कोणत्या ८ कंपन्यांचे मूल्यांकन कमी झाले पाहू या?

  1. आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ला सर्वाधिक तोटा झाला आहे. टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये ५६,२७९.३५ कोटी रुपयांची घट झाली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप ११,८१,४५०.३० कोटी रुपयांवर आले आहे. कंपनीचे जून तिमाहीचे निकाल गुंतवणूकदारांना आवडले नाही. यामुळे शुक्रवारी टीसीएसच्या शेअर्समध्ये सुमारे ३.५० टक्क्यांनी घसरण झाली.
  2. टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे मूल्यांकन ५४,४८३.६२ कोटी रुपयांनी घसरले आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप १०,९५,८८७.६२ कोटी रुपयांवर आले आहे.
  3. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ४४,०४८.२ कोटी रुपयांनी घसरून २०,२२,९०१.६७ कोटी रुपयांवर आले. कंपनीचे तिमाही निकाल पुढील आठवड्यात येणार आहे. त्यापूर्वीच कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
  4. देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे मूल्यांकन कमी झाले आहे. या कंपनीचे मूल्यांकन १८,८१८.८६ कोटी रुपयांनी घसरून ६,६२,५६४.९४ कोटी रुपयांवर आले आहे.
  5. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल कमी झाले आहे. त्यामध्ये १४,५५६.८४ कोटी रुपयांची घसरण झाली आहे. आता ते १०,१४,९१३.७३ कोटी रुपयांवर आले आहे.
  6. भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एलआयसीचे मूल्यांकन ११,९५४.२५ कोटी रुपयांनी घसरले आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे मूल्यांकन आता ५,८३,३२२.९१ कोटी रुपये झाले आहे.
  7. खाजगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ४,३७०.७१ कोटी रुपयांनी घसरून १५,२०,९६९.०१ कोटी रुपये झाले आहे.
  8. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅपिटलसुद्धा कमी झाले आहे. एसबीआयचे मूल्यांकन २,९८९.७५ कोटी रुपयांनी घसरून ७,२१,५५५.५३ कोटी रुपयांवर आले आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.