AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानींनी दिले न्यू इयर गिफ्ट, ‘या’ प्लॅनसोबत मिळणार 2150 रुपयांचे फायदे

मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने युजर्सना न्यू इयर गिफ्ट देण्यासाठी खास जिओ ऑफर काढली आहे. जिओच्या या ऑफरअंतर्गत युजर्संना २१५० रुपयांचे बेनिफिट्स मोफत दिले जात आहेत. चला तर मग जाणून घेऊया या संधीचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता.

मुकेश अंबानींनी दिले न्यू इयर गिफ्ट, 'या' प्लॅनसोबत मिळणार 2150 रुपयांचे फायदे
Mukesh AmbaniImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 6:58 PM
Share

यंदाचे २०२४ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असून नवं वर्ष २०२५ची सुरुवात लवकरच होणार आहे. त्यामुळे या नववर्षानिमित्त मुकेश अंबानी यांनी त्यांच्या युजर्ससाठी न्यू इयर गिफ्टस देण्याचे ठरवले आहेत. जर तुमच्याकडेही जिओ कंपनीचा सिमकार्ड असेल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे, खरं तर मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ नववर्षाच्या निमित्ताने युजर्सना मोफत गिफ्ट देत आहे. कंपनी जिओ युजर्सला 2150 रुपयांचे बेनिफिट्स असलेले फ्री गिफ्ट म्हणून देत आहे. नेमकी काय आहे ही ऑफर आणि तुम्ही या ऑफरचा फायदा कसा घेऊ शकता?

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही Jio New Year Offer 2025 चा बेनिफिट्स 2025 रुपयांच्या प्लॅनसोबत दिला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया या जिओच्या या रिचार्ज प्लॅनसोबत 2150 रुपयांचा फायदा कसा मिळणार आहे आणि हा प्लॅन कोणत्या बेनिफिट्ससोबत येतो.

जिओ 2025 प्लॅनचे डिटेल्स

जिओच्या २०२५ या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. 2025 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 200 दिवसांची वैधता दिली जाईल. याशिवाय तुम्हाला ट्रॅव्हल आणि फूड कूपन डिस्काऊंट व्हाउचरही मोफत दिले जाणार आहेत.

या प्लॅनमध्ये 2150 रुपयांचा असा फायदा मिळणार

तुम्ही जेव्हा नवीन वर्षानिमित्त जेव्हा 2025 रुपयांचा प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला रिलायन्स जिओकडून EasemyTrip चे व्हाउचर मिळेल, ज्याचा वापर तुम्ही फ्लाइट तिकीट बुकिंगवर करू शकता. या व्हाउचरच्या माध्यमातून तुम्ही फ्लाइट बुकिंगवर 1500 रुपयांपर्यंत च्या सवलतीचा लाभ घेऊ शकाल.

तसेच जिओकडून कपडे खरेदी केल्यास किमान २९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. याशिवाय स्विगीला 150 रुपयांचे व्हाउचर दिले जात आहे, जे तुम्ही स्विगीवर रिडीम करू शकता आणि 150 रुपयांच्या डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता.

किती दिवस मिळणार लाभ?

रिलायन्स जिओच्या या ऑफरचा लाभ तुम्ही 11 जानेवारी 2025 पर्यंत घेऊ शकाल, म्हणजेच 11 जानेवारीपर्यंत 2025 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज केल्यास तुम्हाला 2150 रुपयांचा फायदा मिळेल.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....