AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्विगीचे सीईओ आणि सहसंस्थापक श्रीहर्ष यांची संपत्ती माहीतीये ? लंडनची नोकरी सोडून सुरु केले स्टार्टअप

श्रीहर्ष मजेटी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमधील नोमुरा इंटरनॅशनलमध्ये इंटर्न म्हणून नोकरी केली. या ट्रेडींग कंपनीत त्यांचे फारसे मन रमले नाही.

स्विगीचे सीईओ आणि सहसंस्थापक श्रीहर्ष यांची संपत्ती माहीतीये ? लंडनची नोकरी सोडून सुरु केले स्टार्टअप
swiggy - sriharsha majetyImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 21, 2023 | 3:13 PM
Share

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध फूड डीलिव्हरी कंपनी स्विगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी देशातील तरूण उद्योजक आहेत. त्यांच्या जन्म 1988 रोजी कर्नाटकातील बंगळुरु या शहरात एका उद्योजक परिवारात झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजस्थानच्या बिरला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एंड सायन्समधून इंजीनिअरिंग डीग्री घेतली. त्यानंतर 2011 मध्ये आयआयएम कोलकातातून एमबीए पूर्ण केले.

श्रीहर्ष मजेटी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडनमधील नोमुरा इंटरनॅशनलमध्ये इंटर्न म्हणून नोकरी केली. या ट्रेडींग कंपनीत त्यांचे फारसे मन रमले नाही. त्यांना स्वत:चा काही तरी स्टार्टअप सुरु करण्याची इच्छा त्यांनी शांत बसू देत नव्हती. अखेर एका वर्षातच त्यांनी नोकरी सोडून त्यांनी देशात परतणे पसंत केले. त्यांनी सायकलद्वारे फ्रान्स, इटली आणि स्पेनसह अनेक युरोपीय देशात 3,000 किमीचा प्रवास केला आहे.

कुरीयर कंपनीचे स्विगीत रुपांतर केले

मजेटी यांनी त्यांचा मित्र नंदन रेड्डी यांच्यासह 2013 मध्ये ईबे आणि फ्लिपकार्टला पर्याय देण्यासाठी बंडल ई – कॉमर्स कंपन्यांच्या डीलिव्हरीसाठी शिपींग कंपनी काढली. त्यानंतर पुढच्या वर्षी बंडलचे नाव बदलून त्यांनी स्विगी केले. पहाता पहाता स्विगी देशातील सर्वात मोठी ऑनलाईन फूड ऑर्डरिंग सर्व्हीस बनली. स्विगीचे 25 हून अधिक शहरात 20 हजाराहून अधिक रेस्टॉरंटशी पार्टनरशिप आहे. साल 2017 मध्ये एकाच महिन्यात पन्नास लाख ऑनलाईन ऑर्डरचा विक्रम स्वीगीने केला होता.  मजेटी यांची संपत्ती 14,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यांना मिळत असलेल्या पगाराबद्दल काही माहीती मिळालेली नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.