सायबर भामट्यांना चकवा, क्रेडिट-डेबिट कार्डासाठी नियमात बदल, नवीन वर्षात नवी पेमेंट पद्धत

आता तुमचा ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहे. सायबर भामट्यांना चकवा देण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहेत. त्यासाठी काही बदल होत आहेत. जाणून घेऊयात त्याविषयी

सायबर भामट्यांना चकवा, क्रेडिट-डेबिट कार्डासाठी नियमात बदल, नवीन वर्षात नवी पेमेंट पद्धत
क्रेडिट-डेबिट कार्ड
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 6:00 AM

सध्या ऑनलाईन पेमेंटची चलती आहे. डिजिटल युगात रोख रक्कम देण्यापेक्षा मोबाईलमधील पेमेंट एपद्वारे काही सेंकदात व्यवहार पूर्ण होत असल्याने आणि खिशात रक्कम ठेवण्याची झंझट मिटत असल्याने सध्या डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर तर फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. मात्र सायबर भामट्यांनी अनेकदा क्रेडिट आणि डेबीट कार्डधारकांना गंडा घातला आहे. त्यांच्या खात्यातील रक्कमेवर हात साफ केला आहे. डिजिटल फिशिंगच्या जाळ्यापासून कार्डधारकांना संरक्षण देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढे सरसावली आहे. ग्राहकाचा घामाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन नियम लागू होणार आहेत.

क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापराचे हे नियम येत्या नववर्षात 1 जानेवारी 2022 रोजी पासून लागू होतील. याविषयीचे मार्गदर्शक तत्वे आरबीआयने जाहीर केली आहेत. त्यामुळे पेमेंट करताना अधिक काळजी घेण्यात येणार आहे. ग्राहकांची सवंदेनशील माहिती यापुढे शेअर होणार नाही. कार्डचा वापर सुरक्षित होणार आहे. त्यासाठी एनक्रिप्टेड टोकन वापरण्याची RBI ने सूचना केली आहे.

रिझर्व्ह बँकेने व्यापार आणि पेमेंट गेटवे कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉरमवर ग्राहकांचा संचित (Store) डाटा काढण्याची सूचना केली आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2022 पासून व्यवहार होताना इनक्रिप्टेड टोकनचा वापर होणार आहे. मर्चंट बँका, वित्तीय संस्था यांना ग्राहकांची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर जतन ठेवता येणार नाही.  त्यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित व्यवहार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

टोकनायझेशन काय आहे

प्रत्येक व्यवहार करताना ग्राहकाचा 16 आकडी कार्ड क्रमांक, कार्ड एक्सपायरी डेट, सीवीवी आणि ओटीपी ही माहिती भरावी लागत होती. तर ट्रान्झेशन पिन ही द्यावी लागत होती. आता ही माहिती ग्राहकाला व्यवहार करताना देण्याची गरज नाही. कार्ड डिटेल्ससाठी कार्ड नेटवर्क ग्राहकांना एक कोड जनरेट करुन देईल. त्यालाच टोकन म्हणतात. या टोकनमुळे ग्राहकांची खासगी माहिती दिली जाणार नाही. ग्राहकांच्या डाटा आधारे त्यांना चूना लावण्याचा, ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांना यामुळे आळा बसेल.

संबंधित बातम्या : 

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य ‘या ‘पद्धतीनं चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स

डोळे चक्रावतील ! उद्योगपती एलन मस्क 8,32,71,48,50,000.00 रुपये एवढा कर भरणार, भारतातल्या काही राज्यांचं बजेटही एवढं नाही?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.