ICICI Bank सह 3 बँकांकडून नवी सेवा सुरू; मोबाईल नंबरवरून दररोज पाठवा 1 लाख रुपये

आता आपण फक्त मोबाईल नंबरद्वारे आपल्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना 1 लाख रुपयांपर्यंत पाठवू शकता. 

ICICI Bank सह 3 बँकांकडून नवी सेवा सुरू; मोबाईल नंबरवरून दररोज पाठवा 1 लाख रुपये
ICICI bank
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 7:32 PM

नवी दिल्ली : कोरोना काळात संक्रमण टाळण्यासाठी लोकांनी रोख व्यवहार मोठ्या प्रमाणात टाळलेत. लोकांनी डिजिटल व्यवहारांना अधिक प्राधान्य दिलेय. विशेष म्हणजे यात बऱ्याच समस्याही उद्भवल्या. जेव्हा लोकांना त्यांच्या कुटुंबातील किंवा मित्र-नातेवाईकांकडे एकरकमी पैसे मोठ्या प्रमाणात काढावे लागले. बरीच डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स त्यांच्या वापरकर्त्यांना दिवसामध्ये एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रोख रक्कम हस्तांतरित करण्याची परवानगी देतात. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागला असेल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता आपण फक्त मोबाईल नंबरद्वारे आपल्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना 1 लाख रुपयांपर्यंत पाठवू शकता.

एअरटेल पेमेंट्स बँकेने पे टू कॉन्टॅक्ट

आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँकेने पे टू कॉन्टॅक्ट किंवा पे कॉन्टॅक्ट सर्व्हिस सेवा सुरू केलीय. या नवीन सेवेंतर्गत आपण आपल्या मोबाईल नंबरद्वारे मित्राला किंवा कोणत्याही नातेवाईकाला त्यांच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठविण्यास सक्षम असाल. आतापर्यंत यूपीआयमार्फत पैसे पाठविण्यासाठी इतरांच्या बँक खात्याचा तपशील किंवा यूपीआय आयडी आवश्यक होते. एकदा ही सेवा सुरू झाल्यानंतर यापुढे याची आवश्यकता नाही.

पैसे कसे पाठवायचे

>> सर्व प्रथम आपल्या बँकेचे अ‍ॅप उघडा. त्यानंतर पे टू कॉन्टॅक्टवर क्लिक करा किंवा आपला संपर्क क्रमांक द्या. >> मोबाईल फोनबुक उघडा. त्यानंतर आपणास कोणाला पैसे पाठवायचे ते निवडा. >> हे करताच बँकेच्या अ‍ॅपवर आपोआपच संपर्काचा यूपीआय पत्ता मिळेल. यासाठी यूपीआय पत्ता देखील असावा. >> आता रक्कम आणि पासवर्ड प्रविष्ट करा. यानंतर हे पैसे दुसर्‍याच्या खात्यात जातील. >> बँकांच्या म्हणण्यानुसार, यूपीआयच्या नव्या सेवेसह पेमेंट करताना यूपीआय आयडी किंवा बँकेचा तपशील आवश्यक नाही. >> नवीन सेवेच्या माध्यमातून कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 50 हजार रुपयांपर्यंत हस्तांतरण करण्यास परवानगी देईल. >> आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक दररोज 1 लाख रुपयांपर्यंत पैसे हस्तांतरित करू शकतात.

संबंधित बातम्या

चांगली बातमी! आता फक्त 5 मिनिटांत अंगठा लावून ATM मधून काढा रेशन, जाणून घ्या प्रक्रिया

‘या’ नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा

New services launched by 3 banks with ICICI Bank; Send Rs 1 lakh daily from mobile number

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.